शेती शिवार टीम,14 मे 2022 :- Nutrients for High Cholesterol Level : कोलेस्टेरॉल हा शरीरात आढळणारा एक प्रकारचा फॅट आहे. हे शरीराद्वारे तयार केले जाते, कोलेस्टेरॉल हे अन्नामध्ये देखील आढळते. शरीराला व्यवस्थित काम करण्यासाठी काही प्रमाणात कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते,परंतु कोलेस्टेरॉलची हाय लेव्हल रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकते.अतिरिक्त कोलेस्टेरॉलमुळे हृदशरीरात कोलेस्ट्रॉल वाढलंय हे कसं ओळखाल ? कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी आहारात खा ही 6 पोषक तत्व.यविकाराचा धोकाही वाढतो.कोलेस्टेरॉलचा वापर पेशींच्या भिंती तयार करण्यासाठी, हार्मोन्स तयार करण्यासाठी केला जातो.कोलेस्टेरॉल रक्तामध्ये लिपोप्रोटीनद्वारे वाहून जाते.लिपोप्रोटीनचे मुख्य प्रकार HDL आणि LDL आहेत.
HDL कोलेस्ट्रॉल ‘गुड’ कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते. LDL कोलेस्टेरॉल ‘बॅड’ कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते.कारण LDL तुमच्या धमन्यांमध्ये कोलेस्टेरॉल सोडते.अशा परिस्थितीत हृदय निरोगी ठेवण्यासाठी LDL कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.
यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत,खाण्यापिण्यात काही आवश्यक बदल करावे लागतील.आज आम्ही तुम्हाला अशाच काही पोषक तत्वांबद्दल सांगणार आहोत, जे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.तसेच हृदयविकाराचा धोका कमी होतो.
1.फायबर :-
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी फायबर हे खूप आवश्यक पोषक तत्व आहे. कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांनी दररोज 20-35 ग्रॅम फायबर घेण्याची शिफारस केली जाते. अन्न पचनासाठी तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी फायबर महत्त्वाचे आहे. फायबरमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.ओट्स,, ओट ब्रॅन, कड धान्य, फळे आणि भाज्या फायबरचे चांगले स्रोत आहेत.
2. कमी कॅलरीयुक्त पदार्थ :-
लठ्ठपणामुळे हृदयविकार आणि वाढत्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्ही कमी कॅलरीयुक्त पदार्थ खाऊ शकता.कमी-कॅलरी भाज्यांमध्ये विरघळणारे फायबर देखील असते. ओट्स, सूप, चिया सीड्स, ग्रीक दही हे लो-कॅलरी पदार्थ मानले जातात.
3.फोर्टिफाइड स्टेरॉल्स आणि स्टॅनॉल फूड्स :-
वनस्पतींमधून काढलेले स्टेरॉल्स आणि स्टॅनॉल्स अन्नातून कोलेस्टेरॉल शोषून घेण्याची शरीराची क्षमता वाढवतात. दिवसातून 2 ग्रॅम प्लांट स्टेरॉल किंवा स्टॅनॉल घेतल्याने एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवता येते.
4. प्रोटिन्स :-
प्रोटिन्स हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.प्रोटिन्सयुक्त टोफू आणि सोया दूध हे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी प्रभावी म्हणून ओळखले जाते. दररोज 25 ग्रॅम सोया प्रोटीनचे सेवन केल्याने एलडीएल (LDL) कमी होण्यास मदत होते.
5. ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् :-
ओमेगा 3 फॅटी ऍसिड खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी फायदेशीर म्हणून ओळखले जाते. ओमेगा 3 रक्तप्रवाहातील ट्रायग्लिसराइड्स कमी करते, हृदयाची असामान्य पंप टाळण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा मासे खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.
6. मॅग्नेशियम :-
मॅग्नेशियम हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. एवोकॅडो,बदाम,अंजीर,पालक आणि पॉपकॉर्नमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. ते खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवता येते.उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मॅग्नेशियमचा समावेश केला पाहिजे.
उच्च कोलेस्टेरॉल पातळीमुळे हृदयविकाराचा झटका,हृदय अपयश यांसारखे घातक आजार होऊ शकतात.कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या सर्व पोषक घटकांचा आहारात समावेश करावा.उच्च कोलेस्टेरॉल असलेले तेच अन्न टाळावे. यांमुळे तुमचे हृदय नेहमी निरोगी राहील, तुम्ही देखील नेहमी निरोगी राहाल…
हाय कोलेस्टेरॉलची लक्षणे :-
हाय कोलेस्टेरॉलची कोणतीही लक्षणे नसली तरी, अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या संशोधकांच्या मते, मेंदू किंवा हृदयाकडे रक्त प्रवाह अवरोधित झाल्यास याची काही चिन्हे शरीरात दिसतात. कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका जास्त असतो. याशिवाय शरीरात आणखी काही लक्षणे दीर्घकाळ राहिल्यास ते गंभीर लक्षण मानले जाऊ शकते.
मळमळणे.
जबडा आणि हात दुखणे.
जास्त घाम येणे
श्वास घेण्यास त्रास होणे.
हृदयाची धडधड वाढणे / भीतीचं प्रमाण वाढणे
दम लागणे.