Take a fresh look at your lifestyle.

सावधान ! वेगाने पसरतोय आय फ्लू, पश्चिम महाराष्ट्रात हजारो रुग्ण.. कसा कराल स्वतःचा बचाव ? पहा आरोग्य सल्ला..

0

डोळे येण्याची साथ (आय फ्लू) आता वेगाने वाढत चालली असून, पुणे विभागात सर्वत्र रुग्ण आढळले आहेत. वातावरणातील अनिश्चित बदलांमुळे साथीचे रोग पसरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे डोळे येणे. राज्यभरात सध्या डोळ्यांची साथ पसरली आहे.

लहान मुलांना डोळे येण्याचे प्रमाण अधिक आहे. यावर्षी डोळ्यांचा संसर्ग सौम्य स्वरुपाचा दिसत असला तरी संसर्ग मात्र मोठ्या प्रमाणात आहे दरम्यान, घाबरुन न जाता योग्य ती काळजी घ्या. गरज असल्यास डॉक्टरांकडे जा, अशा सूचना आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरसह पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात डोळ्यांची साथ जोमाने वाढत आहे. डोळे येण्याचा आजार हा औषधांशिवाय बरा होऊ शकतो.रुग्णांना घाबरून जाण्याची गरज नाही.

दिवसातून हात पाच वेळा स्वच्छ धुवा. डोळे पाण्याने स्वच्छ करा. मेडिकलमध्ये जाऊन स्टरॉईड डाळ्यांमध्ये सोडले तर धोका संभवू शकतो. मात्र डोळे आलेल्या रुग्णांपासून दूर राहा, असे आवाहन करण्यात आले आहे.

डोळे येण्याची लक्षणे..

डोळे लाल होणे आणि पिवळसर द्रव डोळ्यातून येणे.

डोळ्यातून सतत पाणी येत राहणे.

डोळे सतत चोळावेसे वाटणे.

दोन्ही डोळ्यांना एकदम सूज येणे.

डोळ्यांना सतत खाज येणे.

पापण्या एकमेकांना चिकटणे.

असामान्यपणे डोळ्यांतून जास्त अश्रू येणे.

डोळ्यांतून पाण्यासारखा किंवा घट्ट स्राव येणे

डोळ्यात किरकिरी जाणवणे डोळ्यांना सूज येणे.

अशी घ्या काळजी :-

डोळे किंवा चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी आणि नंतर हात धुवून घ्या

टेबलाचा पृष्ठभाग आणि दरवाजाचे हॅन्डल यांसारख्या सार्वजनिक वापराच्या वस्तूंना कमीत कमी स्पर्श करा

तुमचे डोळे लालसर आहेत तोपर्यंत शाळेत किंवा कामावर जाणे टाळा.

दुसऱ्यांचे औषध – आय ड्रॉप वापरू नका

दुसऱ्यांचे टॉवेल, उशी आणि बेडशीट यासारख्या वस्तू वापरणे टाळा.

आय फ्लू साठी घरगुती उपाय काय आहेत ?

डोळ्यांच्या फ्लूपासून मुक्त होण्यासाठी, डोळ्यांना गरम किंवा थंड पाण्याने शेकवा.

काही प्रकारचे स्वच्छ सूती कापड किंवा टॉवेल गरम करून डोळ्यांवर ठेवा.

टॉवेल किंवा कापड गरम पाण्यात भिजवून किंवा बर्फाचे तुकडे गुंडाळूनही डोळ्यांवर ठेवता येते.

जर तुम्हाला डोळा फ्लू सारखा आजार असेल तर कॉन्टॅक्ट लेन्स घालणे टाळा. तोपर्यंत इतर गॉगल वापरता येतील.

डोळ्यांच्या मेकअपपासून दूर राहा.

आय फ्लू झाल्यास डोळ्यांचा मेकअप करू नका कारण यामुळे संसर्ग होण्याचा आणि पुन्हा परत येण्याचा धोका वाढतो.

शक्य असल्यास, शक्य तितक्या कमी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करा.

गुलाबपाणी वापरा. डोळे धुण्यासाठी गुलाबपाणी वापरा, त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो.

गाजर आणि पालक दोन्ही डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तुम्ही गाजर आणि पालकाचा रस नियमित सेवन करू शकता..

डोळे येण्याचा आजार हा संसर्गजन्य आहे, सध्या तो सर्वत्र पसरत आहे. सर्वांनी काळजी घ्यावी. डोळे चोळू नयेत. डोळे स्वच्छ थंड पाण्याने धुवावेत. त्रास सुरू झाल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. वाढत चाललेला हा आजार रोखण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, लवकरच त्यावर नियंत्रण मिळेल अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.