शेतीशिवार टीम, 11 जून 2022 : स्पर्धा परीक्षा असो किंवा सरकारी किंवा खासगी नोकरीसाठी मुलाखत असो, सामान्य ज्ञान हे सर्वात महत्त्वाचे असते. आपल्या आजूबाजूला घडणारी प्रत्येक घटना ही सामान्य ज्ञान असते. पण त्यांना लक्षात ठेवणे कठीण आहे. परंतु परीक्षेची तयारी करणारे उमेदवार त्यांच्या अभ्यासक्रमासोबतच त्यांच्या क्षेत्रातील विषयांवरही लक्ष केंद्रित करतात. आपण अशाच सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न जाणून घेणार आहोत, जे मुलाखतींसाठी तुमच्यासाठी महत्त्वाचे असू शकतात….
प्रश्न : भोजपुरी ही कोणत्या देशाची राष्ट्रभाषा आहे ?
उत्तर : मॉरिशस, भोजपुरीला 2011 मध्ये मॉरिशसची राष्ट्रीय भाषा घोषित करण्यात आली.
प्रश्न : भारतात मोबाईलचा वापर कधीपासून सुरु झाला ?
उत्तर : भारतात 31 जुलै 1995 रोजी मोबाईलचा वापर करण्यात आला.
प्रश्न : मानवी शरीरातील सर्वात व्यस्त असणारा अवयव कोणता आहे ?
उत्तर : मानवी शरीरात एकूण 78 अवयव असतात. त्यापैकी ‘हृदय’ हा सर्वात जास्त व्यस्त असलेला अवयव आहे.
प्रश्न : आत्तापर्यंतची सर्वात जास्त काळ चालू असलेली ‘टीव्ही सीरियल’ कोणती आहे ?
उत्तर : ”तारक मेहता का उल्टा चष्मा” ही सर्वात जुनी टीव्ही मालिका आहे. ही मालिका 2008 पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेने आतापर्यंत अनेकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे.
प्रश्न : जगातील सर्वात थंड फळ कोणत्या फळाला म्हटलं जातं ?
उत्तर : ‘बेल’ हे जगातील सर्वात थंड असणार फळ आहे.
प्रश्न : मानव जातीने सर्वप्रथम कोणता प्राणी पाळला होता ?
उत्तर : “कुत्रा” हा प्रथम मानवाने पाळीव केला होता.
प्रश्न : जगातील सर्वात थंड असलेलं ठिकाण कोणतं?
उत्तर : “अंटार्क्टिका खंड” हे असे ठिकाण आहे जे जगातील सर्वात थंड ठिकाण आहे असे म्हटले जाते.
प्रश्न : कोणत्या उपग्रहाला भारताचा पहिला उपग्रह म्हटलं गेलं आहे ?
उत्तर : “आर्यभट्ट” याला भारताचा पहिला उपग्रह म्हटले जाते.
प्रश्न : ऑस्कर जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे ?
उत्तर : ‘भानू अथैया’ यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ड्रेस डिझायनर म्हणून ओळखलं जातं. ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. गांधी चित्रपटासाठी त्यांना 1983 मध्ये सर्वोत्कृष्ट कॉस्टयूम डिझायनरचा अकॅडमी पुरस्कार मिळाला होता.
प्रश्न : भारतातील कोणत्या शहराला ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ म्हटलं जातं ?
उत्तर : भारतातील “श्रीनगर” ला “पृथ्वीवरील स्वर्ग” म्हणतात.
प्रश्न : असं कोणतं कार्य आहे, जे कार्य माणूस मेल्यानंतरही करू शकतो ?
उत्तर : अवयवदान हे असं कार्य आहे, जे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही करता येते. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अवयव दान केले जातात, जे एखाद्या गरजू व्यक्तीमध्ये प्रत्यारोपण केलं जातं.
प्रश्न : असा कोणता प्राणी आहे, जो कधीही पाणी पीत नाही ?
उत्तर : कांगारू रॅट हा एक प्राणी आहे जो कधीही पाणी पीत नाही.
प्रश्न : असा कोणता देश आहे जिथे फक्त मुलीच दारू पिऊ शकतात?
उत्तर : पेरू असा देश आहे, जिथे मध्ये फक्त मुलीच दारू पिऊ शकतात…