Take a fresh look at your lifestyle.

शासनाची शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना; मिळवा 2 लाखांपर्यंत अर्थसहाय्य, पहा, पात्रता, कागदपत्रे, PDF फॉर्म – अर्ज प्रोसेस..

0

ज्या प्रमाणे केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते, त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील असते. शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सरकार विविध योजना राबवत असते. अश्याच अनेक योजनांपैकी महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना दिली जाणारी अपघात विमा सुरक्षा योजना म्हणजेच गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, या योजनेद्वारे सरकार शेतकऱ्यांना अपघाती विमा बहाल करते.

शेती मध्ये काम करत असताना अनेक वेळा अपघात होण्याची शक्यता असते जसे की, अंगावर वीज पडणे, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे किंवा या व्यतिरिक्त रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काही शेतकऱ्यांना या अपघातामुळे कायमचे अपंगत्व देखील येते.

अश्या परिस्थितीत कुटुंबावर आर्थिक संकट निर्माण होते. अशा शेतकरी कुटुंबाला आर्थिक लाभ मिळावा या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने 2004-05 साली शेतकरी अपघात विमा योजला सुरु केली होती. 2016 साली या योजनेला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना हे नाव देण्यात आलं.

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकरी हे आर्थिक समस्येने त्रस्त जीवन जगत असल्यामुळे त्यांना स्वतःचा विमा उतरवणे शक्य होत नाही. आर्थिक परिस्थिती कमजोर असल्या कारणामुळे ते विम्याचा हफ्ता भरण्यासाठी असमर्थ असतात व अशा वेळी एखाद्या शेतकऱ्याचा शेतात काम करताना अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला जीवन जगण्यासाठी खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारे लाभ :-

शेतीची कामे करताना अपघात झाल्यास अपघातामुळे 1 डोळा व 1 अवयव निकामी झाल्यास शासनातर्फे 1 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येते.

एखाद्या शेतकऱ्याचा शेतीची कामे करताना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 अवयव निकामी झाल्यास 2 लाख रुपये रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्यात येते.

शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत विम्याचा हफ्ता भरण्याची आवश्यकता नाही कारण महाराष्ट्र शासन विम्याची रक्कम स्वतः भरते.

शेतीची कामे करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकार कडून 2 लाखांचे आर्थिक सहाय्य कुटुंबाला देण्यात येते.

शेतीची कामे करताना शेतकऱ्याला अपंगत्व आल्यास त्याला शासनाकडून 1 लाखांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते.

पात्रता :-

या योजनेअंतर्गत शेतकरी व त्याच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य त्यामध्ये आई वडील, शेतकऱ्याची पती / पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण 2 जणांना या योजनेचा लाभ घेता येईल. सोबतच अर्जदार शेतकरी आणि त्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे मूळ निवासी असणे आवश्यक आहे.

योजनेच्या अटी :-

फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
फक्त शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
अर्जदाराने शेतकऱ्याने शासनाच्या इतर कोणत्या अपघातग्रस्त योजनेचा लाभ घेतला असेल तर तो शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबाला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेता येणार नाही.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 75 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे

योजनेअंतर्गत समाविष्ट अपघाती कारणे :-

केवळ खाली दिलेल्या वेगवेगळ्या कारणामुळे शेतकऱ्यांना अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला तरच या योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंत आर्थिक मदत केली जाते तसेच अपघाताच्या स्वरूपानुसार विमा रक्कम मंजूर केली जाते.

वाहन अपघात
रस्त्यावरील अपघात
विजेचा शॉक लागून मृत्यू
रेल्वे अपघात
खून
उंचावरून पडून झालेला अपघात
नक्षलवाद्यांकडून हत्या
हिंस्त्र जनावरांनी चावल्यामुळे मृत्यू किंवा जखमी होणे.
दंगल
पाण्यात बुडून मृत्यू
अंगावर वीज पडून मृत्यू होणे
नैसर्गिक आपत्ती
पूर
सर्पदंश
विंचू दंश
जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यास खालील कारणासाठी लाभ घेता येणार नाही

नैसर्गिक मृत्यू
विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व
आत्महत्येचा प्रयत्न
वळच्या लाभार्थ्यांकडून / वारसाकडून खून
गुन्हयाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात
अमली पदार्थाच्या सेवनामुळे झालेला अपघात
भ्रमिष्टपणा
बाळंतपणातील मृत्यू
शरीरांतर्गत रक्तस्त्राव
आत्महत्या
स्वतःला जाणीवपूर्वक जखमी करून घेणे
मोटार शर्यतीतील अपघात

आवश्यक कागदपत्रे :-

अर्ज
7/12
अर्जदाराचे नॅशनलाईज बँकेत बचत खाते असणे आवश्यक
बचत खाते क्रमांक
शाखा
आय एफ एस सी कोड
इंनक्वेस्ट पंचनामा
वाहन चालविण्याचा वैध परवाना
मृत्यू दाखला
अपंगत्वाचा दाखला
शिधापत्रिका
एफ आय आर
एखादा अपघात झाल्यास प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल
अकस्मात मृत्यूची खबर
अपघात घटनास्थळ पंचनामा
पोष्ठ मार्टेम रिपोर्ट
वारासदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक
कृषी अधिकारी पत्र
औषधोपचाराचे कागदपत्र
डिस्चार्ज कार्ड
घोषणापत्र
पासपोर्ट आकाराचा फोटो
वयाचा दाखला (जन्माचा दाखल किंवा शाळा सोडल्याचा दाखल)

हा अर्ज तुम्हाला तुमच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करायचा आहे. या अर्जाची PDF डाउनलोड करण्यासाठी :- इथे क्लीक करा

Leave A Reply

Your email address will not be published.