शेतीशिवार टीम, 20 जानेवारी 2022 : ICC ने 2021 सालासाठी कसोटीतील सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. तीन भारतीय खेळाडूंना आयसीसी कसोटी संघात स्थान मिळाले आहे. यामध्ये सलामीवीर रोहित शर्मा, यष्टिरक्षक ऋषभ पंत आणि अष्टपैलू आर अश्विन यांच्या नावांचा समावेश आहे. आयसीसीने न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसनची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.
याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूला T20 आणि ODI संघात स्थान मिळाले नव्हते. भारताच्या 3 खेळाडूंशिवाय, पाकिस्तानच्या 3, न्यूझीलंडच्या 2, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या प्रत्येकी एका खेळाडूला या यादीत स्थान मिळाले आहे.
भारतीयांचे होते वर्चस्व :-
गेल्या वर्षी कसोटीच्या फॉर्मेटमध्ये रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि आर अश्विन यांनी चमकदार कामगिरी केली होती. हिटमॅनने 21 डावांत 906 धावा केल्या, तर पंतने 12 सामन्यांत 39.36 च्या सरासरीने एकूण 748 धावा केल्या. अश्विनने बॉलिंग आणि बॅटिंगमध्येही चांगली कामगिरी केली. 9 कसोटी सामन्यात 355 धावा करण्यासोबतच त्याने 54 विकेट्स घेतल्या.
विल्यमसनला मिळालं कर्णधारपद :-
आयसीसीने किवी कर्णधार केन विल्यमसनची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. 2021 मध्ये, केनच्या नेतृत्वाखाली, न्यूझीलंडने भारताचा पराभव करून कसोटी विजेतेपद पटकावले. याशिवाय त्याने बॅटनेही चांगला खेळ दाखवला. विल्यमसनने चार कसोटीत 46.03 च्या सरासरीने 395 धावा केल्या. सात डावात त्याच्या बॅटने एक शतक आणि एक अर्धशतकही झळकावले.
2021 मध्ये कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा आणि शतके झळकावणाऱ्या जो रूटलाही संघात स्थान मिळाले आहे. रूटने 15 सामन्यात 61 च्या सरासरीने 1708 धावा केल्या आणि 6 शतके झळकावली. श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने, ज्याच्या बॅटने 906 धावा केल्या, त्याचीही संघात निवड झाली. अश्विनशिवाय शाहीन शाह आफ्रिदी (47) आणि हसन अली (41) जो सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

ICC टेस्ट टीम ऑफ द इयर :-
दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका), रोहित शर्मा (भारत), केन विल्यमसन (कर्णधार, न्यूझीलंड), मार्नस लॅबुशेन (ऑस्ट्रेलिया), जो रूट (इंग्लंड), फवाद आलम (पाकिस्तान), ऋषभ पंत (भारत), रविचंद्रन अश्विन (भारत), काइल जेमिसन (NZ), शाहीन शाह आफ्रिदी (पाकिस्तान), हसन अली (पाकिस्तान)