द.आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ जाहीर ; बुमराह, राहुल, रोहितचे पुनरागमन, अजिंक्य राहणे इन का आऊट ?
शेतीशिवार टीम, 8 डिसेंबर 2021 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा केली. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवड समितीने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे, तर चार खेळाडूंना स्टँडबाय म्हणून संघात निवडले आहे.
रोहित शर्मा, ऋषभ पंत, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह यांना न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती, त्यांच संघात पुनरागमन झालं आहे.
दुखापतीमुळे रवींद्र जडेजा संघातून बाहेर पडला आहे. याशिवाय श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी या दोघांनाही संघात स्थान मिळालं आहे. रोहित शर्माला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. अजिंक्य रहाणेला संघात कायम ठेवलं आहे. परंतु त्याचं उपकर्णधार काढून घेतलं आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
स्टँडबाय खेळाडू: नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अरजन नगवासवाला.
रवींद्र जडेजा, शुबमन गिल, अक्षर पटेल आणि राहुल चहर हे दुखापतीमुळे संघातून बाहेर पडले आहे. याशिवाय ऑल इंडिया सीनियर सिलेक्शन कमिटीने एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही रोहित शर्माकडे सोपवलं आहे. विराट आता फक्त कसोटी संघाचे नेतृत्व करेल आणि एकदिवसीय आणि टी-20 संघात फलंदाज म्हणून खेळेल.
Squad: Virat Kohli (Capt),Rohit Sharma(vc), KL Rahul, Mayank Agarwal, Cheteshwar Pujara, Ajinkya Rahane, Shreyas Iyer, Hanuma Vihari, Rishabh Pant(wk), Wriddhiman Saha(wk), R Ashwin, Jayant Yadav, Ishant Sharma, Mohd. Shami, Umesh Yadav, Jasprit Bumrah, Shardul Thakur, Md. Siraj. pic.twitter.com/6xSEwn9Rxb
— BCCI (@BCCI) December 8, 2021
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक :-
पहिली कसोटी, 26-30 डिसेंबर, सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन
दुसरी कसोटी, जानेवारी 03-07, वांडरर्स, जोहान्सबर्ग
तिसरी कसोटी, 11-15 जानेवारी, न्यूलँड्स, केपटाऊन
या दौऱ्यात टीम इंडियाला तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळायची आहे. मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 19 जानेवारीला, दुसरा एकदिवसीय सामना 21 जानेवारीला आणि शेवटचा एकदिवसीय सामना 23 जानेवारीला होणार आहे.
पहिले दोन वनडे पार्ल येथील बोलंड पार्क येथे खेळवले जातील, तर शेवटचा एकदिवसीय सामना केपटाऊन येथील न्यूलँड्स मैदानावर खेळवला जाईल.