शरीरात का वाढतं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण ? ‘ही’ आहेत मुख्य 5 लक्षणे, बॅड कोलेस्ट्रॉलपासून स्वतःला कसं वाचवाल ?
शेतीशिवार टीम, 8 डिसेंबर 2021 : कधी चर्चेत नसलेलं कोलेस्टेरॉलचं नावं आज आज लहान मुलांना देखील माहिती पडतं. परंतु कोलेस्ट्रॉल म्हणजे काय, हे कदाचित मोठ्यांनाही फार कमी माहिती असेल, पण गमतीची गोष्ट म्हणजे कोलेस्टेरॉलची भीती सर्वांनाच असते, सोप्या शब्दात सांगायचे तर, कोलेस्टेरॉल हा एक प्रकारचा फॅट आहे जो रक्तामध्ये असतो. हे देखील दोन प्रकारात येते, पहिला LDL दुसरा HDL. जर तुमचा LDL मोठ्या प्रमाणावर वाढला तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.
LDL हृदयाला हानी पोहोचवतं आणि HDLमुळे हृदयाला फायदा होतो…
**** कोलेस्ट्रॉल वाढण्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत :-
वाईट जीवनशैली, व्यायाम आणि योगासने न करणे.
जंक फूड आणि तळलेले अन्न जास्त प्रमाणात खाणे, कडधान्य-भाजीपाला व फळे यांचे सेवन न करणे, जास्त मद्यपान, कोल्ड्रिंक्स पिणे.
कौटुंबिक इतिहासात कोलेस्टेरॉल रोग अधिक सामान्य आहे.
मानसिक तणावामुळेही कोलेस्ट्रॉल वाढते.
**** कोलेस्ट्रॉल वाढण्याची मुख्य लक्षणे :-
हाता-पायांना झिणझिण्या किंवा मुंग्या येणे
डोकेदुखी
श्वास भरून येणे
जाडेपणा
छातीत दुखणे आणि अस्वस्थता
**** कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी खालील रामबाण उपाय आहेत, त्यांचा अवलंब करा आणि स्वतःला कोलेस्ट्रॉलपासून वाचवा….
1 ) दुधात एक चमचा हळद टाकून किंवा रोज प्यायल्याने कोलेस्ट्रॉल अगदी सामान्य होतं . कारण हळदीमध्ये आढळणारे घटक रक्तवाहिन्या स्वच्छ करण्याचं काम करतात.
2 ) दररोज जेवणानंतर एक कप ग्रीन- टी प्यायल्यास ग्रीन टीमध्ये आढळणारे घटक बॅड कोलेस्ट्रॉलही मोठ्या प्रमाणात कमी करतात. ग्रीन – टीचे कॅप्सूल देखील बाजारात येतात, तुम्ही ते सकाळ संध्याकाळ घेऊ शकता…
3 ) एक चमचा कोरफडचा रस (Aloe vera juice) , एक चमचा आवळ्याचा रस थोडे कोमट पाण्यात मिसळून सकाळी अनुशापोटी प्यायल्यानेही फायदा होतो.
4) तुळस आणि गुळवेलचा रस सकाळी प्यायल्यानेही कोलेस्ट्रॉल कमी होतं. रसाऐवजी तुम्ही तुळस आणि गुळवेलच्या दोन गोळ्या कोमट पाण्यासोबत सकाळ संध्याकाळ घेऊ शकता.
5 ) रात्रीच्या जेवणानंतर दोन चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर कोमट पाण्यासोबत प्यायले तरी तुमचे कोलेस्ट्रॉल बर्याच प्रमाणात कमी होऊ शकते.
6) जरी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी गव्हाचा रस (Wheatgrass juice) प्यायला तरीही तुम्ही तुमचे कोलेस्ट्रॉल बर्याच प्रमाणात कमी करू शकता.
7 ) कोलेस्टेरॉलसाठी सर्वोत्तम आणि प्रभावी मार्ग म्हणजे नियमित योगासने करणे, थोडेसे चालणे, कोलेस्ट्रॉल कमी करणारे योग तुम्ही YouTube पाहूनही करू शकता.
8) दिवसातून किमान 2 ते 3 लिटर पाणी प्या, त्यात लिंबू पिळून प्यायला तर जास्त फायदा होतो, त्याच बरोबर दालचिनी पाण्यात उकळून किंवा चहामध्ये टाकून प्यायल्यास कोलेस्ट्रॉलही लक्षणीय प्रमाणात कमी होतं.
नारळाचे पाणी रोज प्यायल्याने तुम्ही कोलेस्ट्रॉल मोठ्या प्रमाणात कमी करू शकता. या सर्व टिप्स तुम्हाला बॅड कोलेस्ट्रॉलपासून आराम देतील.