स्पीडही सुपरफास्ट अन् सेफ्टी पण…! काही सेकंदात शंभरी गाठणाऱ्या या 3 मिड साईझ SUV पहा, किंमत 6 लाखांपेक्षाही कमी…
देशात स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल्स म्हणजेच (SUV) ची डिमांड दिवसेंदिवस वाढत आहे, खासकरून कॉम्पॅक्ट SUV सेगमेंट लोकांना फारच आवडत आहे. सध्या बाजारात अशी अनेक मिड साईझ एसयूव्ही (SUV) वाहने आहेत ज्यांची किंमत कमीच नाही तर त्या न्यू अँडव्हान्स टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहेत.
तस पाहिलं तर प्रत्येकाला एसयूव्ही (SUV) कडून चांगल्या वेगाची आणि पिकअपची अपेक्षा असते. आज आपण अशाच परवडणाऱ्या SUV वाहनांची यादी लिस्ट पाहणार आहोत, ज्यांच्या किमती कमी आहेत पण पॉवरफुल इंजिनमुळे त्यांना स्पीडही खूपच चांगलं आहे. विशेष म्हणजे या एसयूव्हीच्या किंमत 6 लाख रुपयांपासून स्टार्ट होतात. चला तर मग जाणून घेऊया या SUVs बद्दल…
रेनॉल्ट किगर (Renault Kiger) :-
फ्रेंच कार निर्माता रेनॉल्टची परवडणारी SUV Kiger एकूण 2 इंजिन ऑप्शनसह येते, त्याचे 1 लिटर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन 72PS पॉवर आणि 96Nm टॉर्क निर्माण करते. दुसरीकडे, 1 लिटर टर्बो-पेट्रोलचा ऑप्शनही उपलब्ध आहे, जो 100PS पॉवर आणि 160Nm टॉर्क जनरेट करतो. दोन्ही इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहेत. त्याचे टर्बो इंजिन केवळ 10.20 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास Km/h वेग पकडते.
Renault Kiger SUV चे अँडव्हान्स फीचर्स न्यू क्रूझ कंट्रोल फीचर्स, Android Auto, Apple कार प्ले कनेक्टिव्हिटी आणि ARKAMYS 3D साउंड (4 स्पीकर + 4 tweeters) सह इंटेरिअर स्मार्ट बनवण्यात आलं आहे.
याशिवाय स्मार्टफोन चार्जर, पुश स्टार्ट/स्टॉप स्मार्ट अँक्सेस कार्ड, रिअर व्ह्यू कॅमेरा आणि ऑटोमॅटिक एअर कंडिशनिंग (AC) यासारख्या अँडव्हान्स फीचर्सचाही यात समावेश करण्यात आला आहे. त्याची स्टार्टींग प्राईस 5.99 लाख ते 10.62 लाख रुपये आहे.
निसान मॅग्नाइट (Nissan Magnite) :-
जपानी ऑटोमेकर Nissan नेही परवडणारी एसयूव्ही (SUV) मॅग्नाइटला लॉन्च केलं आहे. ही SUV तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ही ठरू शकते. Nissan Magnite एकूण दोन इंजिन ऑप्शनसह ऑफर केली आहे. एका व्हेरियंटमध्ये, कंपनीने 1.0 लिटर क्षमतेचे नॅच्युरली एस्पिरेटेड इंजिन दिलं आहे, जे 72 PS पॉवर आणि 96 Nm टॉर्क जनरेट करतं. दुसरीकडे, 1.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन इतर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे, जे 100 PS पॉवर आणि 160 Nm टॉर्क जनरेट करतं. ही इंजिने 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्सशी जोडलेली आहेत. त्याचे टर्बो इंजिन व्हेरियंट 0 ते 100 Km/h चा वेग फक्त 10.30 सेकंदात पकडते.
निसान मॅग्नाइटला वायरलेस Android Auto, Apple कारप्लेसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 16-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील, LED DRL सह एलईडी हेडलॅम्प आणि बॅक सीट्स व्हेंटसह ऑटो एसीसह सुसज्ज केलं आहे. याशिवाय, वायरलेस फोन चार्जर, एअर प्युरिफायर, JBL स्पीकर,अँम्बियंट लाइटिंग आणि पुडल लॅम्प यांसारखे फीचर्स त्याच्या टॉप व्हेरियंट XV आणि XV प्रीमियम ट्रिम्समध्ये उपलब्ध आहेत.
सेफ्टी फीचर्समध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, हिल स्टार्ट असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल यांचा समावेश आहे. या SUV ची स्टार्टींग प्राईस 5.97 लाख ते 10.79 लाख रुपये आहे.
ह्युंदाई व्हेनु (Hyundai Venue) :-
Hyundai ची प्रसिद्ध कॉम्पॅक्ट SUV व्हेन्यू (Venue) देखील तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. ही SUV तीन इंजिन ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन 83PS पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करते. तसेच, 1.0 लीटर टर्बो इंजिन 120PS पॉवर आणि 172Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय डिझेल इंजिनचा ऑप्शन म्हणून 1.5 लिटर इंजिन उपलब्ध आहे. याचे टर्बो पेट्रोल इंजिन सर्वात पॉवरफुल आहे आणि हे व्हेरियंट 10.70 सेकंदात 0 ते 100 Km/h वेग पकडते.
अलीकडेच या SUV फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च करण्यात आलं आहे. ज्यामध्ये काही नवे फीचर्स समाविष्ट करण्यात आली आहेत. SUV ला अलेक्सा आणि गुगल व्हॉईस असिस्टंट सपोर्ट, एअर प्युरिफायर, ऑटो एसी, कूल्ड ग्लोव्हबॉक्स आणि पुश-बटण स्टार्ट/स्टॉप सारख्या कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसह 8-इंच टचस्क्रीन मिळते.
इतर फीचर्समध्ये इलेक्ट्रिकली अँडजस्टेबल ड्रायव्हर सीट, सिंगल-पॅन सनरूफ आणि वायरलेस फोन चार्जिंग यांचा समावेश आहे. सेफ्टीच्या दृष्टीने, यात 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), एक रीअरव्ह्यू कॅमेरा, रियर पार्किंग सेन्सर्स आणि हिल-होल्ड असिस्ट आहेत. या SUV ची किंमत 7.53 लाख ते 12.72 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.