शेतीशिवार टीम,11 डिसेंबर 2021:- स्वतःच भविष्य सुरक्षित करण्यासाठी, भारतातील मोठ्या संख्येने लोक LIC च्या योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक करतात. तुम्ही तुमच्या LIC पॉलिसीचा मासिक प्रीमियम वेळेवर भरला तर तुमची एलआयसी पॉलिसी सुरळीत चालते. तुम्ही LIC प्रीमियम रोख आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे भरू शकता.
तुम्हाला माहित आहे का की, तुम्ही पीएफ (PF) खात्यातूनही तुमचा एलआयसी प्रीमियम (LIC Premium) देखील भरू शकता ? पीएफ (PF) खात्यातून एलआयसी प्रीमियम भरणे खूप सोपं आहे. ही प्रक्रिया करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
भारतातील अनेक लोक त्यांचा एलआयसी प्रीमियम (LIC Premium) पीएफ (PF) खात्याद्वारे भरतात. तर आपण जाणून घेऊयात PF खात्यातून LIC प्रीमियम भरण्याच्या काही टिप्स….
यासाठी प्रथम तुम्हाला EPFO चा फॉर्म 14 डाउनलोड करावा लागेल. फॉर्म 14 डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला https://www.epfindia.gov.in/site_docs/PDFs/Downloads_PDFs/Form14.pdf या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर, त्यात सर्व आवश्यक डिटेल्स काळजीपूर्वक प्रविष्ट करा.
हा फॉर्म ईपीएफ (EPF) आयुक्तांच्या नावाने भरायचा आहे. फॉर्मद्वारे, ईपीएफ (EPF) फंडातून एलआयसीचा प्रीमियम (LIC Premium) भरण्याची परवानगी मागितली जाते. एकदा तुमचा फॉर्म व्हेरिफाय केला जाईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या PF च्या पैशाने LIC चा प्रीमियम सहज भरू शकाल…
नियम व अटी :-
तुमच्यासाठी EPFO मध्ये खातं असणे अनिवार्य आहे.
2 वर्षांपासून EPFO सदस्य म्हणून संबद्ध असलेला कर्मचारी.
EPFO मध्ये गुंतवलेले तुमचे पैसे हे तुमच्या भविष्यासाठी आहे.
केवळ आणीबाणीच्या परिस्थितीतच एलआयसी प्रीमियम (LIC Premium) भरण्यासाठी तुमचे पीएफ पैसे वापरण्याचा प्रयत्न करावा.