शेतीशिवार टीम, 11 जानेवारी 2022 : मागील वर्षी 2021 मध्ये, अनेक (Multibagger shares) नी गुंतवणूकदारांना प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदे दिले आहेत. Covid-19 महामारीच्या काळात प्रचंड विक्री आणि त्यानंतर मार्केट मध्ये तितक्याच जलद रिकव्हरीमध्ये असे अनेक पेनी स्टॉक मल्टीबॅगर्सच्या लिस्ट मध्ये सहभागी झाले आहेत. असाच एक मल्टीबॅगर पेनी स्टॉक म्हणजे लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीज (Lloyds Steels Industries), ज्याने आपल्या शेयरहोल्डर्सनां उत्कृष्ट रिटर्न देऊन मालामाल केलं. चला सविस्तर माहिती जाणून घेउयात….
दोन वर्षांत 5,100% वाढ :-
हा मल्टीबॅगर मेटल स्टॉक 10 जानेवारी 2021 रोजी NSE वर 0.50 रुपयांवर स्टॉप झाला.त्याच वेळी, 10 जानेवारी 2022 रोजी, हा स्टॉक NSE वर प्रति शेअर ₹ 26.15 वर स्टॉप झाला आहे.अशा स्थितीत गेल्या दोन वर्षांत त्यात सुमारे 5,100 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक मागील एका आठवड्यात 21.65 रुपयांवरून 26.15 रुपयांपर्यंत वाढला आहे, ज्यामुळे त्याच्या गुंतवणूकदारांना सुमारे 21 % रिटर्न्स मिळाला आहे. जर आपण एका महिन्यापूर्वी बोललो तर हा पेनी स्टॉक ₹ 11.85 वरून ₹ 26.15 च्या लेव्हल वर वाढला आहे. लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीजच्या या शेअर्स ला या कालावधीत त्यांच्या गुंतवणूक दारांना सुमारे 120 % रिटर्न्स दिला आहे.
6 महिन्यांत 600% रिटर्न्स दिला :-
गेल्या 6 महिन्यांत लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत ₹3.75 वरून ₹26.15 पर्यंत मोठी वाढ झाली आहे. या कालावधीत ते जवळपास 600 % वाढले आहे. त्याचप्रमाणे, गेल्या एका वर्षात, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक ₹ 1.00 प्रति शेअर वरून ₹ 26.15 प्रति शेअर इतका वाढला आहे. या मेटल स्टॉकने या कालावधीत सुमारे 2500 %वाढ नोंदवली आहे.
गुंतवणूकदारांना ₹ 52 लाखांचा नफा झाला :-
लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीजच्या स्टॉक हिस्ट्रीजनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका आठवड्यापूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये ₹1 लाख गुंतवले असते, तर त्याचे ₹1 लाखाचे आज ₹1.21 लाख झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी या पेनी स्टॉकमध्ये ₹1 लाख गुंतवले असते, तर त्याचे ₹1 लाखाचे आज ₹2.20 लाख झाले असते तर 6 महिन्यांत ते ₹7 लाख झाले असते.
त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये ₹1 लाख गुंतवले असते आणि आजपर्यंत त्यात गुंतवणूक केली असती, तर त्याचे ₹1 लाख आज सुमारे ₹26 लाख झाले असते. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये ₹1 लाख गुंतवले असते, तर त्याचे ₹1 लाखाचे आज ₹52 लाख झाले असते.