Maruti ला मोठा झटका ; ‘या’ लक्झरी SUV ला खरेदीदार मिळेना ; जुलै 2022 मध्ये एकही ग्राहक मिळालं नाही ; पहा डिटेल्स…
शेतीशिवार टीम : 24 ऑगस्ट 2022 :- मारुतीच्या सर्व नेक्सा (Nexa) डीलरशिपवर सर्व प्रीमियम कार उपलब्ध आहेत. या यादीत न्यू ग्रँड विटारा सोबतच XL6, Ignis, Baleno, Ciaz आणि S-Cross आहेत. म्हणायला ही 6 मॉडेल्स आहेत, परंतु आता एका SUV कडं ग्राहक डुंकूनही पाहत नाही. आपण मारुतीच्या लक्झरी एसयूव्ही एस-क्रॉसबद्दल बोलत आहोत.
ही SUV बंद करण्याचा निर्णय नवीन ग्रँड विटारा (Grand Vitara) लाँच झाल्यानंतर घेण्यात आला होता, परंतु त्याची अवस्था अशी होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. खरं तर, तुम्हाला जुलै 2022 मध्ये एकही एस-क्रॉस (S-cross) विकली गेली नाही. कंपनीने अद्यापही विक्री थांबवली नाही हे मॉडेल अजूनसुद्धा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर देखील लिस्ट आहे.
ग्रँड विटारा आली अन् एस-क्रॉसला खाऊन गेली :-
गेल्या महिन्यात म्हणजे जुलैमध्ये, जेव्हा मारुती आपली नवीन ग्रँड विटारा लॉन्च करणार होती, तेव्हा अशी बातमी आली होती की, ती एस-क्रॉसची जागा घेईल. म्हणजेच ग्रँड विटारा लाँच झाल्याने लक्झरी कार एस-क्रॉस (S-cross) चा प्रवास संपणार आहे. या बातमीचा प्रभाव इतका होता की, लोकांचे लक्ष एस-क्रॉसकडे वळलं. त्यामुळे जुलै महिन्यात एकही युनिट विकलं गेलं नाही. तर, जूनमध्ये 697 एस-क्रॉस युनिट्स विकले गेले.
नेक्सा आउटलेटची पहिली कार होती S-Cross :-
मारुती एस-क्रॉस ही Nexa आउटलेटवरून विकली जाणारी पहिली कार होती. नंतर, नेक्साच्या पोर्टफोलिओचा विस्तार करून, कंपनीने इग्निस, बलेनो, सियाझ आणि XL6 लाँच केले. मारुती नेक्सा आऊटलेट्सवर आपल्या प्रीमियम कारची विक्री करते. XL6 हे सध्या Nexa शोरूममधील सर्वात महाग मॉडेल आहे. XL6 ची स्टार्टींग मॉडेलची किंमत रु.11.29 लाख ते रु.14.55 लाख आहे. तर, S-Cross ची स्टार्टींग प्राईस एक्स-शोरूम – किंमत 8.95 लाख रुपये आहे.
जुलै 2021 मध्ये, S-Cross च्या 1972 युनिट्सची विक्री झाली. म्हणजेच जुलै 2022 मध्ये त्याची वार्षिक विक्री शून्यावर आली. म्हणायचे तर या वर्षी मार्च आणि एप्रिलमध्ये एस-क्रॉसचा बोलबाला होता. मार्च 2022 मध्ये 2674 आणि एप्रिलमध्ये 2922 युनिट्सची विक्री झाली. आता कंपनीसमोर मोठा प्रश्न आहे की, आजपर्यंत त्यांचं मॉडेल बंद झालं नाही. त्यामुळे येत्या काही महिन्यांत लोक ते खरेदी करतील की नाही ?
कंपनी या महिन्यात S-Cross वर 42,000 रुपयांची मोठा डिस्काउंट देखील देत आहे. यामध्ये 12,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 25,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट ऑफर समाविष्ट आहे.
S-Cross चे फीचर्स आणि किंमत :-
S-Cross च्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर मारुती ही एक अतिशय लक्झरी कार आहे. यात रेन सेन्सिंग वायपर, क्रूझ कंट्रोल, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आहेत. यात 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. जे Apple CarPlay आणि Android Auto Connect फीचर्ससह येते.
यात 1.5-लिटर इंजिन आहे, जे 105PS पॉवर आणि 138Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे. S-Cross ने युरो NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार एडल्ट प्रोटेक्शन रेटिंग प्राप्त केलं आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 8.95 रुपये ते 12.92 लाख रुपये आहे.