NewTax Slab 2023 : तुमचं उत्पन्न ₹7.5 लाख, ₹10 लाख, ₹15 लाखांपर्यंत आहे का ? तुम्हाला होणार थेट 37500 रु. फायदा, जाणून घ्या कॅल्क्युलेशन..
बजेट अन् मध्यमवर्ग.. हे असे दोन शब्द आहेत, ज्यांची दरवर्षी आणि प्रत्येक वेळी चर्चा होते. 2023 च्या अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्र्यांनी या वर्गाला खूश करावे ही सर्वात मोठी मागणी होती. आणि अर्थमंत्र्यांनी हे काही प्रमाणात हे करून दाखवलं आहे. करात सूट दिली आणि तीही भरभरून दिली. परंतु, न्यू Tax Slab मध्ये ही सूट मिळाली आहे. जुनी करप्रणाली जशी होती तशीच परिस्थिती राहिली. अनेक वर्षांनी अशी संधी आली जेव्हा सरकारने मध्यमवर्गीयांना मोठी भेट दिली. आता ही भेट तुमच्यासाठी किती उपयुक्त आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. या आर्टिकल मध्ये आपण जाणून घेणार आहोत की, जर तुमची कमाई 7 लाखांपासून 15 लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला किती कर भरावा लागणार ?
7 लाखांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही..
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सध्याच्या व्यवस्थेला धक्का न लावता अर्थसंकल्पात नवीन आयकर स्लॅब दिला आहे. नवीन कर प्रणालीमध्ये हा स्लॅब देण्यात आला आहे. प्रथम अर्थमंत्र्यांनी काय बदल केले आहेत ते समजून घेऊया. नवीन प्राप्तिकर स्लॅबमध्ये वार्षिक 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे, म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपये असेल तर तुम्हाला रिबेटसह कोणताही कर भरावा लागणार नाही..
New Tax Slab मध्ये नेमकं काय आहे ?
0 ते 3 लाख रुपये – 0% कर..
3 ते 6 लाख रुपये – 5% कर..
6 ते 9 लाख रुपये – 10% कर..
9 ते 12 लाख रुपये – 15% कर..
12 ते 15 लाख रुपये – 20% कर..
15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30% कर..
मूलभूत कर सूट मर्यादा वाढली, मानक वजावट (Standard Deduction)
नवीन कर प्रणालीमध्ये मूळ सूट मर्यादा (Tax free limit) 3 लाख रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी अडीच लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर लागत नव्हता. त्याचबरोबर 6 टॅक्स स्लॅब ऐवजी आता 5 टॅक्स स्लॅब असणार आहे. ज्यामध्ये 5 लाखांऐवजी 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न सवलतीसह करमुक्त केलेलं आहे. याशिवाय, नवीन कर प्रणालीमध्ये 15.5 लाख रुपये कमावणाऱ्यांना स्टँडर्ड डिडक्शनचा लाभही मिळणार आहे, जो 52,500 रुपयापर्यंत असणार आहे.
7 लाखांपेक्षा कमी उत्पन्नावर कर नाही, पण 7.50 लाखांवर किती कर ?
जर उत्पन्न 7 लाखांपेक्षा कमी असेल तर कोणताही कर भरावा लागणार नाही. तुम्हाला रिबेटसह सूट मिळेल. पण, जर तुमचे उत्पन्न 7 लाख 50 हजार असेल तर तुमच्या 7 लाखांच्या उत्पन्नावर कर लागणार नाही असे नाही. उलट कराचा हिशोब असा असेल.
0 ते 3 लाख रुपये – 0
3 ते 6 लाख रुपयांवर 5% = 15 रु.
6 ते 7.50 लाख रुपये 10% = 15 रु.
एकूण कर : 30 हजार रुपये (+ Sess लागू होईल)
10 लाखांच्या वर नवीन स्लॅबमधून किती कर आकारणार ?
0 ते 3 लाख रुपये = 0
3 ते 6 लाख रुपये 5% = 15,000 रु.
6 ते 9 लाख रुपये 10% = 30,000 रु.
9 ते 12 लाख रुपये 15% = 15,000 रु.
एकूण कर – रु 60,000 कर + उपकर (Sess)
जुन्या कर प्रणालीमध्ये 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 75,000 रुपये कर आकारला जात होता. नवीन कर प्रणालीच्या नव्या रचनेत 60 हजार रुपये कर भरावा लागणार आहे.
जुन्या कर प्रणालीतून 15 लाखांवर किती कर आकारला जायचा ?
0 ते 2.5 लाख रुपये = 0
रु. 2.5 ते रु. 5 लाख 5% = रु. 12,500
रु. 5 ते रु 7.5 लाख 10% = रु 25,000
रु 7.5 ते रु 10 लाख 15% = रु. 37,500
रु 10 ते रु 12 लाख 20% = रु 50,000
रु. 12 ते 15 लाख 25% = रु. 62,500
एकूण कर – रु 1,87,500
नवीन प्रणाली अंतर्गत 15 लाखांवर किती कर आकारला जाणार ?
0 ते 3 लाख रुपये = 0
3 ते 6 लाख रुपये 5% = 15,000 रु
6 ते 9 लाख 10% = 30,000 रु
9 ते 12 लाख रुपये 15% = 45,000 रुपये
12 ते 15 लाख रुपये 20% = 60,000 रुपये
एकूण कर – रु 1,50,000
15 लाखांवर नवीन कर प्रणाली अंतर्गत 37 हजार 500 रुपयांचा फायदा होणार आहे.