Hero च्या फर्स्ट EV स्कूटरची डिलिव्हरी सुरु, 165km रेंज, फक्त 3 सेकंदात पकडणार 40Kmph चा वेग, जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त..
Hero MotoCorp ने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 ची डिलिव्हरी दिल्लीतही सुरू केली आहे. त्याची डिलिव्हरी बेंगळुरू आणि जयपूरमध्ये सुरू झाली आहे. कंपनीने सांगितले की लवकरच देशातील इतर शहरांमध्ये स्कूटरची विक्री सुरू केली जाणार आहे.
कंपनी आपल्या चार्जिंग स्टेशनचाही विस्तार करणार आहे. कंपनीने हे दोन व्हेरियंट Vida V1 Pro आणि Vida V1 Plus मध्ये लॉन्च केले आहे. त्याची सुरुवातीची एक्स – शोरूम किंमत 1.45 लाख रुपये आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, ते आपल्या सेगमेंटमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्ससह सुसज्ज आहे. यात टच स्क्रीन डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, कीलेस कंट्रोल आणि अँलॉय व्हील यांसारखे फीचर्स आहेत. भारतीय बाजारपेठेत त्याची थेट स्पर्धा ओला इलेक्ट्रिक, एथर एनर्जी, टीव्हीएस आयक्यूब आणि बजाज चेतक यांच्याशी होणार आहे.
Hero Vida V1 Pro रेंज :-
Vida V1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 80 Kmph आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, स्कूटरची बॅटरी 1.2 किलोमीटर प्रति मिनिट या वेगाने चार्ज होते. IDC च्या मते, ही ई-स्कूटर पूर्ण चार्ज करून 165 किलोमीटरपर्यंत देऊ शकते. तुम्ही 3.2 सेकंदातचं 0-40 किमी प्रतितास वेग पकडू शकता..
हीरो विडा V1 प्लस की रेंज :-
Hero Vida V1 Plus चा टॉप स्पीड देखील 80 Kmph आहे. स्कूटरची बॅटरी 1.2 किलोमीटर प्रति मिनिट या वेगाने चार्ज होते. IDC नुसार, ही ई – स्कूटर पूर्ण चार्ज करून 143 किलोमीटरपर्यंत धावू शकते तर 3.2 सेकंदात 0-40 किमी प्रतितास वेग वाढवते.
बॅटरी पूर्णपणे सेफ..
या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीबद्दल Hero MotoCorp म्हणणं आहे की, ती पूर्णपणे सुरक्षित आहे. कंपनीने बॅटरीची कसून टेस्ट केली आहे. बॅटरीची हाय टेम्परेचरमध्ये 2 लाख किलोमीटर, 25 हजार तास टेस्ट घेण्यात आली आहे. त्याची बॅटरी पडल्यानंतर किंवा आदळल्यानंतरही त्याच क्षमतेने आपले काम करत राहील.
तुम्ही स्कूटरमधून बॅटरी काढू शकता आणि सोबत घेऊन जाऊ शकता. हे घर किंवा ऑफिसमध्ये कुठेही चार्ज करता येते. कंपनीने 72 तास सतत टेस्ट ड्राइव्ह देखील केली आहे. यात 7 इंची टचस्क्रीन आहे. यात कीलेस कंट्रोल आणि क्रूझ कंट्रोलही आहे.