महाअपडेट टीम, 14 जानेवारी 2022 : मारुती सुझुकी या वर्षातील आपले पहिले वाहन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही कार असेल मारुती सेलेरिओ सीएनजी (Maruti Celerio CNG). हे मॉडेल येत्या काही दिवसांत शोरूममध्ये पोहोचण्यासाठी सज्ज आहे. परंतु, कंपनीने अद्याप अधिकृत लॉन्च डेट आणि बुकिंग डीटेल्स उघड केलेले नाहीत. परंतु, निवडक डीलर्सनी सेलेरियो सीएनजीची (Celerio CNG) 11,000 रुपयांची प्री-ऑर्डर घेणे सुरू केलं आहे. इंडिया कार न्यूजने दिलेल्या वृत्तात असे म्हटलं आहे.
रेगुलर व्हेरियंटपेक्षा जास्त फ्यूल इफीशिएंट असेल CNG मॉडल :-
मारुती सेलेरियोच्या (Maruti Celerio) रेगुलर मॉडेलपेक्षा CNG मॉडलचं अधिक इंधन कार्यक्षम असेल असं अनेक अहवालांमध्ये म्हटलं आहे. कंपनीचा दावा आहे की Celerio चे रेगुलर मॉडेल सध्या 26.68 kmpl (VXi AMT व्हेरियंट) मायलेज देतं.
मारुती सेलेरियो सीएनजी 1.0L, 3 सिलेंडर ड्युअलजेट पेट्रोल इंजिनसह फॅक्टरी-फिट CNG किटद्वारे समर्थित असेल. सीएनजी व्हेरियंटची पॉवर आणि टॉर्क नियमित मॉडेलच्या तुलनेत भिन्न असेल. Celerio CNG ला ट्रान्समिशन ड्युटीसाठी 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलं जाणार आहे.
डिझाइन आणि फीचर्समध्ये नाही होणार कोणताही बदल :-
मारुती सेलेरियो सध्या चार ट्रिम्स LXi, VXi, ZXi आणि ZXi+ मध्ये उपलब्ध आहे. CNG किट काही व्हेरियंटमध्ये देऊ केलं जाऊ शकतं. डिझाईन आणि फीचर्सच्या बाबतीत वाहनात कोणताही बदल होणार नाही. नियमित पेट्रोलवर चालणाऱ्या मॉडेलप्रमाणे, Celerio CNG ला 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, हाइट-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, पुश स्टार्ट/स्टॉप बटण, मागील पार्किंग सेन्सर्स आणि 15-इंच अलॉय व्हील मिळण्याची अपेक्षा आहे.
नवीन मारुती Celerio CNG च्या किमती येत्या काही आठवड्यांत जाहीर केल्या जातील. लॉन्च झाल्यानंतर सेलेरियो सीएनजीची (Celerio CNG) थेट स्पर्धा टाटा टियागो सीएनजीशी (Tata Tiago CNG) होईल.