तुमच्या आवडत्या WagonR, Celerio सहित ‘या’ Cars वर 50 हजारांपेक्षा जास्त डिस्काउंट ; ‘या’ तारखेपर्यंतच लाभ घेण्याची संधी !
शेतीशिवार टीम : 17 जुलै 2022 :- सुझुकीच्या एरिना (Arena) आणि नेक्सा (Nexa) डीलरशिपद्वारे मारुती आपल्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देत आहे. ही सूट कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंटच्या स्वरूपात दिल्या जात आहेत. मारुती सुझुकी सेलेरियोवर (Celerio) 35,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट,15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,500 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे.
कंपनी वॅगनआरच्या (WagonR) 1.0-लिटर वेरिएंट वर रु. 25,000 ची कॅश डिस्काउंट, रु. 15,000 चे एक्सचेंज बोनस आणि रु. 4,500 कॉर्पोरेट डिस्काउंट देत आहे. WagonR आणि स्विफ्ट (Swift) च्या 1.2-लिटर व्हेरियंट वर 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि प्रत्येकी 4,500 रुपयांची कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे.
यासोबतच मारुती सुझुकी एस-प्रेसो Maruti Suzuki S-Presso वर 15,000 रुपयांची कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,500 रुपयांची कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे.
Alto 800 आणि Eeco वर 10,000 रुपयांची कॅश डिस्काउंट,15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,500 रुपयांची कॉर्पोरेट डिस्काउंट मिळू शकतो. डिझायरवर dzire 5,000 रुपयांची कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,500 रुपयांची कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे. नवीन Brezza किंवा Ertiga वर कोणतेही डिस्काउंट नाही.
मारुती आपल्या नेक्सा Nexa रेंजद्वारे एस-क्रॉसवर (S-cross) 22,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देत आहे. इग्निसवर (Ignis) 23,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे.
याशिवाय 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट सियाझ (Ciaz) वर दिला जात आहे. तर, XL6 किंवा नवीन Baleno साठी कोणतीही ऑफर नाही…