प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील 10 कोटीहून अधिक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेच्या 14व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. 28 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 व्या हप्त्याचे पैसे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहे. याबाबतचा तुजोरा कृषी विभागाने दिला आहे.

28 जुलैला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4000 रुपये..

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जुलै रोजी राजस्थानला भेट देणार आहेत. येथील नागौर जिल्ह्यातील जाहीर सभेला ते संबोधित करणार आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदी देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये DBT हस्तांतरणाद्वारे सन्मान निधीचे 18,000 कोटी रुपये हस्तांतरित करणार असून या कार्यक्रमाला एकूण 3 लाख शेतकरी उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी 27 फेब्रुवारी 2023 रोजी 13व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली होती.

परंतु राज्यातील शेतकऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे राज्य सरकारनेही केंद्र सरकारच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेचा पहिला हप्ताही या PM किसानच्या 14 व्या हप्त्याबाबरोबर ट्रान्सफर केला जाणार आहे. यामुळे 28 जुलैला शेतकऱ्यांना 4 हजारांचे गिफ्ट मिळणार आहे.

शेतकऱ्यांना सरकार दर वर्षी 6000 ची आर्थिक मदत करते. केंद्र सरकार हे पैसे 2000 – 2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये देते. त्याचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्चपर्यंत पाठविला जातो.

केंद्र सरकारची ही सर्वात महत्त्वाकांक्षी योजना..

वास्तविक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली. नरेंद्र मोदी सरकारच्या अंतर्गत ही एक केंद्रीय योजना आहे, ज्याचा उद्देश मदतीची गरज असलेल्या शेतकरी कुटुंबांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. पूर्णतः सरकार समर्थित योजना, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही मर्यादित जमीन असलेल्या सर्व शेतकरी कुटुंबांसाठी लागू आहे.

PM Kisan : मोबाइलवरन फक्त 2 मिनिटांत Face KYC करण्यासाठी

इथे क्लिक करा

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात 2000 – 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये एकूण 6,000 रुपये दिले जातात. या योजनेंतर्गत पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, तर दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत दिला जातो. त्याच वेळी, सरकार 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान तिसऱ्या हप्त्यासाठी पैसे हस्तांतरित करते.

या योजनेचे नियम बदलताना, सरकारने लाभार्थ्यांची खाती Know-Your-Customer (KYC) शी लिंक न करणे बंधनकारक केले आहे. ज्यांच्याकडे केवायसी नाही त्यांच्या खात्यात 13 व्या हप्त्याचे पैसे आले नाहीत. तुम्ही तुमचे E-KYC केले नसेल, तर ते लवकर करा, अन्यथा 14 व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत..

याप्रमाणे ऑनलाइन अपडेट करा e-KYC

PM-Kisan च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- www.pmkisan.gov.in.

यानंतर, होमपेजच्या उजव्या बाजूला असलेल्या eKYC पर्यायावर क्लिक करा.

आता तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाका आणि सर्च वर क्लिक करा.

यानंतर आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.

‘Get OTP’ वर क्लिक करा आणि दिलेल्या बॉक्समध्ये OTP टाका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *