Take a fresh look at your lifestyle.

पुणे-बंगळूर ग्रीनफिल्ड महामार्ग : सांगली – साताऱ्यात भूसंपादनाला सुरुवात, प्रति गुंठा मिळणार 5 ते 7 लाखांपर्यंत दर पहा, गावांची नावे अन् रोडमॅप..

0

केंद्राच्या भारतमाला फेज 2 प्रकल्पाचा एक भाग म्हणून प्रस्तावित 699 किमी पुणे-बेंगळुरू एक्स्प्रेस वेसाठी राज्य सरकार 2,233 हेक्टर जमिनीच्या संपादनाला गती देणार अशी चिन्हे आहेत.

महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि सांगली या तीन जिल्ह्यांमध्ये बांधण्यात येणाऱ्या नवीन रस्त्याच्या भूसंपादनाबाबत सोमवारी (7 नोव्हेंबर) झालेल्या बैठकीत उपस्थित राहून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेला दुजोरा दिला आहे. पुणे-बेंगळुरू एक्स्प्रेस वेमुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील दोन आयटी शहरांमधील अंतर 60 किमीने कमी होणार आहे.

या एक्स्प्रेस वे प्रकल्पासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एकूण 7,689 हेक्टर जमीन आवश्यक आहे. त्यापैकी 2,233 हेक्टर महाराष्ट्रात आणि उर्वरित 5,456 हेक्टर जमीन कर्नाटकात संपादित करण्यात येणार आहे. एक्स्प्रेस वेची एकूण लांबी 699 किमी असेल. त्यापैकी एकूण 206 किमी रास्ता महाराष्ट्र राज्यातून जाणार आहे.

महाराष्ट्रातील या द्रुतगती मार्गाची सुरवात कांजळे येथून पुण्याच्या बाह्य रिंगरोडपासून सुरु होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) अंतर्गत हा प्रकल्प राबवला जाणार आहे.

एमएसआरडीसीने भूसंपादनाच्या कार्याला गती देण्याचे आणि याच आर्थिक वर्षात ते पूर्ण देखील करण्याचे मान्य केले आहे. जेणेकरून नवीन रस्ते प्रकल्प पुढील आर्थिक वर्षात हाती घेता येतील. या प्रक्रियेला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी भूसंपादनासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करतील, असे NHAI अधिकाऱ्याने बैठकीनंतर सांगितले.

नवीन रस्ता पुणे आणि बेंगळुरू दरम्यानचे अंतर कमी तर करेलच पण सोबत आपआपसातील संपर्क सुधारण्यास देखील मदत करेल कारण सध्याचा पुणे -बेंगळुरू महामार्ग (NH-4) खूप खराब झाला आहे. प्रस्तावित नवीन मार्ग, एक्सप्रेसवे मानके आणि सुधारित पद्धतीने बांधला जाणार आहे. हा महामार्ग प्रवाश्यांना सुरक्षित आणि जलद प्रवासचा अनुभव देणार असून या महामार्गामुळे प्रवासाचे अंतरही कमी होण्यास मदत होणार आहे.

या दोन्ही शहरांमधील सध्याचा प्रवास सुमारे 12 तासांचा आहे. नवीन मार्ग पूर्ण झाल्यानंतर, तो सुमारे 7 तासां पेक्षा कमी होणार असल्याचं NHAI च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

3 जिल्ह्यांतील गावांची नावे व दर पाहण्यासाठी :-  इथे क्लिक करा

बेंगळुरूमधील सॅटेलाइट रिंग रोडवरील कांजळे ते मुथागडहल्ली हा सहा लेनचा प्रवेश-नियंत्रित एक्स्प्रेस वे आठ लेनपर्यंत विस्तारित केला जाणार आहे. या महामार्गावरील वेग 120 किमी प्रतितास असणार आहे. याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल आणि दोन्ही राज्यांतील जमीन संपादित झाल्यानंतर महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात सांगितले होते की, केंद्र सरकार पुणे आणि बेंगळुरू दरम्यान मुंबईला जोडणारा एक्स्प्रेस हायवे बनवण्याचा विचार करत आहे. हा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पुण्याच्या रिंगरोडजवळ वळण घेऊन कर्नाटकच्या राजधानीकडे धावणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

पुणे-बंगळूर ग्रीनफिल्ड महामार्गाबाबत मोठं अपडेट, पुणे-सातारा-सांगलीतील ‘या’ गावांतून जाणार, पहा, पूर्ण Road Map Alignment…

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय 25 वर्षांपासून उच्च रहदारीची घनता असलेले राज्य महामार्गांना विचारात घेऊन त्यांचे चार किंवा सहा पदरी महामार्गांमध्ये रूपांतर करण्याचा आणि त्यांच्याकडून टोल वसूल करण्याचा विचार करत आहे. गुंतवणूक, व्याज आणि भूसंपादन इ. साठी होणारा खर्च, येत्या 12-13 वर्षांत पूर्णपणे वसूल होणे अपेक्षित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.