Take a fresh look at your lifestyle.

Share Market : राकेश झुनझुनवाला यांनी पुन्हा 10 मिनिटांत गमावले 230 कोटी ; TATA च्या ‘या’ 2 शेयर्सनं केलं मोठं नुकसान

0

शेतीशिवार टीम,20 डिसेंबर 2021 :- देशातील वाढत्या ओमिक्रॉन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. दुपारपर्यंत सेन्सेक्समध्ये 1500 अंकांची घसरण पाहायला मिळाली.

निफ्टी 12:30 पर्यंत 450 हून अधिक अंकांनी खाली आला होता. आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवसाची सुरुवात नकारात्मक झाली. यामुळेच शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला यांना पहिल्या 10 मिनिटांत 230 कोटी रुपयांचा तोटा झाला. या तोट्याचे कारण टाटाच्या दोन कंपन्या आहेत.

सोमवारी सकाळी NSE वर टायटनचे शेअर्स 22.70 रुपयांच्या तोट्याने उघडले, तर शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 2280.40 रुपयांवर बंद झाले. सकाळी 9.25 पर्यंत त्यात आणखी घट झाली. कंपनीचे शेअर्स 2241.10 रुपयांपर्यंत घसरले. शुक्रवारची तुलना केल्यास झुनझुनवालाच्या शेअरमध्येही प्रति शेअर
39.30 रुपयांची घसरण झाली. त्याचप्रमाणे NSE वर टाटा मोटर्सचे शेअर्स देखील सोमवारी सकाळी 10.30 रुपयांनी कमी होऊन 470.20 रुपयांवर उघडले. पुढच्या 10 मिनिटांत कंपनीचे शेअर्स 452.30 रुपयांच्या पातळीवर आले. म्हणजेच प्रति शेअर सुमारे 15.90 रुपयांचा तोटा झाला.

राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 3,37,60,395 शेअर्स आहेत. म्हणजेच त्यांच्याकडे सुमारे 3.80 % शेअर्स आहेत. तसेच त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे (Titan) 1.07% किंवा 95,40,575 शेअर्स आहेत. या दोघांना एकत्र पाहिलं तर त्यांच्याकडे टायटनचे 4,33,00,970 शेअर्स आहेत.तसेच त्यांच्याकडे टाटा मोटर्समध्ये 3,67,50,000 शेअर्स आहेत. म्हणजेच कंपनीच्या भांडवलाच्या 1.11% वाटा होता.

किती झालं नुकसान, गणित समजून घ्या…

टायटन कंपनीच्या शेअरची किंमत 10 मिनिटांत 39.30 रुपये प्रति शेअरवर आली. कंपनीतील राकेश आणि रेखा झुनझुनवाला यांच्या शेअर होल्डिंगनुसार गणना केली तर 170 कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. तसेच टाटा मोटर्सचे शेअर्स 15.90 रुपयांनी खाली आले. राकेश झुनझुनवाला यांचा हिस्सा पाहिला तर त्यांना 60 कोटी रुपयांचं नुकसान झालं.

Leave A Reply

Your email address will not be published.