शेतीशिवार टीम, 11 जानेवारी 2022 : Covid-19 महामारीच्या काळात देशांतर्गत शेअर बाजारातील तेजीमुळे, 2021 मध्ये मोठ्या प्रमाणात स्टॉक मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत सामील झाले आहेत. मल्टीबॅगर स्टॉकच्या या यादीमध्ये सर्व विभागातील स्टॉकचा समावेश आहे. आज आपण अशाच एका शेअरबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने एका वर्षात शानदार रिटर्न्स देऊन गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. या शेयर्सचे नाव आहे – Automotive Stampings and Assemblies ltd. ही टाटा समूहाची कंपनी आहे…

ही कंपनी टाटा समूहाची आहे

2021 मध्ये टाटा समूहाच्या शेअर्सनी चांगले रिटर्न्स दिले आहे. या ग्रुप्समधील बहुतांश कंपन्यांच्या शेयर्सनी एका वर्षात मोठी उडी घेतली आहे. दरम्यान, टाटाच्या ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्ज आणि असेंबलीने (Automotive Stampings and Assemblies) आपल्या कामगिरीने सर्वांना थक्क केले.

ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्ज आणि असेंबलीजच्या शेयर्सने गेल्या 12 महिन्यांत सुमारे 2,800% ची रॅली नोंदवली आहे. मंगळवार, 11 जानेवारी रोजी शेअर 5 टक्क्यांनी वाढून 925.45 रुपयांवर पोहोचला. एक वर्षापूर्वी 11 जानेवारी 2021 रोजी या शेअरची किंमत फक्त 30.6 रुपये होती.

गुंतवणूकदारांना मोठा नफा :-

या ऑटो ऍन्सिलरी कंपनीचे शेअर्स 6 महिन्यांपूर्वी 12 जुलै 2021 रोजी 70.5 रुपयांवरून आता 925.45 पर्यंत वाढले आहेत. या कालावधीत शेयर्सने सुमारे 1,221.13 टक्के रिटर्न्स दिले आहे. 1 महिन्यापूर्वी 13 डिसेंबर 2021 रोजी या शेअरची किंमत फक्त 332.45 रुपये होती. एका महिन्यात या समभागाने 178.37 टक्क्यांपेक्षा दुप्पट रिटर्न्स दिले आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्ज आणि असेंब्लीजच्या (Automotive Stampings and Assemblies) शेअर्समध्ये वर्षभरापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि ते आजपर्यंत ठेवले असते तर आज ती रक्कम सुमारे 30 लाख झाली असती…

काय आहे कंपनीचा व्यवसाय घ्या जाणून…

13 मार्च 1990 रोजी JBM टूल्स म्हणून स्थापन झालेल्या या कंपनीचे नंतर 1 ऑगस्ट 2003 रोजी ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स आणि असेंब्ली असे नामकरण करण्यात आलं. सध्या, Tata Autocomp Systems ची कंपनीत 75% हिस्सेदारी आहे. ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग बॉडी-इन-व्हाइट (BIW) स्ट्रक्चरल पॅनेल्स, स्किन पॅनेल्स, इंधन टाक्या, मागील ट्विस्ट बीम, ऑइल संप आणि ऑटोमोबाईल आणि ऑफलोड वाहन विभागासाठी सस्पेंशन पार्ट आणि पुरवठा यासह ऑटोमोबाईलसाठी शीट मेटल घटक, वेल्डेड असेंबली आणि मॉड्यूल्सचे उत्पादन . कंपनी आपली उत्पादने टाटा मोटर्स, जनरल मोटर्स इंडिया, फियाट इंडिया, पियाजिओ व्हेइकल्स, अशोक लेलँड, जेसीबी, टाटा हिटाची आणि एमजी मोटर्स सारख्या टॉप ऑटोमोबाईल कंपन्यांना विकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *