शेतीशिवार टीम : 31 ऑगस्ट 2022 : टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने मंगळवारी एका निवेदनात म्हटलं आहे की, ते तात्पुरते इनोव्हा क्रिस्टाचे डिझेल व्हेरियंटसाठी ऑर्डर घेणे तात्पुरत्या काळासाठी थांबवणार आहे. परंतु त्याचे बुकिंग पुन्हा कधी सुरू होईल याची कोणतीही मुदत दिलेली नाही.

कंपनीचं म्हणणं आहे की, “जास्त मागणीमुळे, इनोव्हा क्रिस्टाच्या (Innova Crysta) डिझेल व्हेरियंटचा व्हेटिंग पिरियड लक्षणीय वाढला आहे, ज्यामुळे कंपनीने तात्पुरते ऑर्डर घेणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.” कंपनीचं म्हणणं आहे की, सध्या आम्ही ज्या डिलर्सने आधीच बुकिंग केलं आहे त्यांना वाहने पुरवण्याबाबत प्रयत्न करत आहोत.

हे लक्षात घेण्यासारखं आहे की, कंपनीने फक्त डिझेल व्हेरियंटचे बुकिंग थांबवलं आहे, पेट्रोल व्हेरियंट अजूनही बुक केले जाऊ शकते. इनोव्हा क्रिस्टाच्या पेट्रोल व्हेरियंटची किंमत 17.86 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी 23.83 लाख रुपयांपर्यंत जाते. तसेच, डिझेल व्हेरिएंटची किंमत 18.90 लाख रुपयांपासून सुरू होते.

भारतीय बाजारपेठेतील इनोव्हा क्रिस्टा (Innova Crysta) हे सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय मॉडेल आहे, ज्याने त्याच्या सेकंड जनरेशन मॉडेलच्या 1 लाखाहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. जबरदस्त फीचर्स आणि दमदार फरफॉर्मन्समुळे ती या सेगमेंटमधील लीडर आहे.

टोयोटाने 2005 मध्ये इनोव्हा सादर केली होती, तेव्हापासून ती अनेक वेळा अपडेट केली गेली आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार या MPV मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. हे कंपनीच्या बेस्ट सेलिंग मॉडल पैकी एक आहे. ही देशातील सर्वात जुन्या MPV कारपैकी एक आहे. ही कार मोठ्या कुटुंबासाठी ते बिझिनेस वापरासाठी देखील वापरली जाते. फर्स्ट जनरेशन मॉडेलचाही समावेश केला तर 10 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.

टोयोटाच्या या MPV चे लेटेस्ट मॉडल कंपनीने 2016 ऑटो एक्स्पोमध्ये प्रथमच लॉन्च केलं होतं आणि इनोव्हाला इनोव्हा क्रिस्टा असं नाव दिलं होतं. ही MPV भारतीय बाजारपेठेत एकूण 18 व्हेरियंटमध्ये येते. याशिवाय, ही 3-रो MPV ग्राहकांना वेगवेगळे सीटिंग लेआउट्स देखील देते, सीटिंग अरेंजमें चा विचार केल्यास, ही कार 8 सिटांसह देखील उपलब्ध आहे.

कशी आहे, नवीन टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (Innova Crysta) :-

नवीन इनोव्हामध्ये, कंपनीने 2.4-लिटर क्षमतेचे 2GD FTV 4 सिलेंडर डिझेल इंजिन वापरलं आहे, जे 150PS पॉवर आणि 360Nm टॉर्क जनरेट करते. तसेच पेट्रोल व्हेरियंटमध्ये 2.7-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे 166PS पॉवर आणि 245Nm टॉर्क जनरेट करते. साधारणपणे ही कार 12 ते 15 kmpl चा मायलेज देते. विशेष बाब म्हणजे हे 7 सीटर आणि 8 सीटर अशा दोन्ही लेआउटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याची किंमत 17.86 लाख ते 26.54 लाख रुपये आहे.

Toyota Innova Crysta च्या फीचर्सच्या लिस्टमध्ये 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (Android Auto आणि Apple CarPlay सह), 6 स्पीकर, पॉवर ड्रायव्हर सीट, अँम्बियंट लाइटिंग आणि क्रूझ कंट्रोल यांचा समावेश आहे.

कंपनीने त्यात सेफ्टीची ही पूर्ण काळजी घेतली आहे. कारला 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), व्हीकल स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, ISOFIX अँकरेज आणि फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स देखील मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *