Take a fresh look at your lifestyle.

चिंतेत भर ! Omicron वेगाने पसरतोय, राज्यात 4 तर केरळमध्ये 4 नवे रुग्ण ; देशभरातील संख्या 73 वर…

0

शेतीशिवार टीम,16 डिसेंबर 2021:- कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’ आता देशात वेगाने पसरत आहे. बुधवारी, महाराष्ट्र आणि केरळमध्ये या नव्या व्हेरियंटचे 4-4 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर तामिळनाडूमध्येही एक रुग्ण आढळला आहे. देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 73 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 32 रुग्ण आढळले आहेत.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या रिपोर्टनुसार, महाराष्ट्रात आढळलेल्या चार नव्या रुग्णांपैकी 2 रुग्ण उस्मानाबादमधील, 1 मुंबईतील आणि एक बुलढाण्यातील आहे.

यापैकी 3 रुग्णांचे लसीकरण करण्यात झालेलं होतं. संक्रमितांमध्ये 16 ते 67 वयोगटातील एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. रुग्णांना सध्या नॉर्मल लक्षणे जाणवत आहे. तसेच राज्यात आज कोरोनाचे 925 नवीन रुग्ण आढळले असून 10 मृत्यूही झाले आहेत.

आइसोलेशनमध्ये 4 रुग्ण :-

प्राथमिक माहितीनुसार, उस्मानाबाद येथील बाधित हा शारजाहून आला होता आणि दुसरा रुग्ण त्याच्या संपर्कातील आहे. याशिवाय बुलढाण्यातील बुजुर्ग दुबईच्या सहलीवरून परतला होता.

आणि दुसरा रुग्ण मुंबईहून आयर्लंडला गेला होता. या सर्वांना रुग्णालयात आइसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसेच या रुग्णांच्या जवळच्या संपर्काचा शोध घेतला जात आहे.

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या प्रकरणांमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. शास्त्रज्ञ या व्हेरियंटबद्दल अधिकाधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. दक्षिण आफ्रिका आणि यूकेच्या आकडेवारीनुसार, या व्हेरियंटमुळे मुले अधिक बळी पडत आहेत. ब्रिटीश तज्ज्ञांच्या मते, हा व्हेरियंट आगामी काळात सर्वांसाठी एक मोठं आव्हान बनणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.