शेतीशिवार टीम, 23 डिसेंबर 2021 : पतंग उडवणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक माणूस पतंग उडवत असताना अचानक हवेत उडाला.यानंतर बराच वेळ तो दोरीच्या सहाय्याने हवेत डोलत राहिला.

या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ ‘श्रीलंका ट्विट’ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. ही घटना घडली तेव्हा पतंग उडवण्याची स्पर्धा सुरू होती. याच दरम्यान हा अपघात झाला. एक माणूस त्याच्या उर्वरित टीमसह एक मोठा पतंग दोरीने फेकण्याचा प्रयत्न करत असताना अचानक तो हवेत 40 फूट उंच गेला.

त्या माणसाला हवेत डोलताना पाहून त्याचे सर्व साथीदार आश्चर्यचकित झाले. खरंतर तो पतंग इतका जड होता की वाऱ्यासोबत ती व्यक्तीही तिच्यासोबत घेऊन गेली. तो माणूस बराच वेळ हवेत लटकला.

दरम्यान, त्याचे साथीदार त्याला दोरी सोडण्यास सांगू लागले. जेणेकरून ते आणखी वर जाऊ नये. मग पतंग थोडा खाली येताच त्या माणसाने दोरी सोडली आणि जमिनीवर पडला.

या अपघातात त्या व्यक्तीला खूप दुखापत झाली आहे. मात्र सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. सध्या त्यांना जवळच्या पॉइंट पेड्रो रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हा व्यक्ती आपल्या साथीदारांसह मोठा पतंग उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. पण पतंग हवेत उडताच सर्वांनी तो सोडला पण या व्यक्तीने तो धरला, त्यामुळे तो पतंगासह वर गेला.

थाई पोंगलच्या निमित्ताने श्रीलंकेतील जाफना येथे पतंग उडवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आणि या दरम्यान येथे मोठे पतंग उडवले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *