शेतीशिवार टीम,18 डिसेंबर 2021 :- ‘तूप खाल्लं कि रूप येतं’ अशी म्हण प्रसिद्ध आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येक स्वयंपाकघरात तूप आढळतं. ते जेवताना डाळ, कडी, चपातीमध्ये खायला आवडतं. तूप केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काही गोष्टी तुपासोबत मिसळून खाल्यास आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं.
हळद आणि तूप :-
हळदीचं तूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. त्यामुळे वजन झपाट्याने कमी होतेच, पण नव्या रक्तपेशी तयार होण्यासोबतच हृदयाच्या आरोग्यासाठीही याचा फायदा होतो. यामुळे किडनीचे कार्य सुधारतं आणि शरीरातील जळजळ होण्याची समस्या दूर होते. पोषण तज्ञांचा असा दावा आहे की, हळदीसह तूप शरीरातील जवळजवळ सर्व प्रकारच्या वेदनांपासून दूर ठेऊ शकतात.
तुळस आणि तूप :-
जर तुम्ही घरी तूप बनवताना पाहिलं असेल तर तुम्हाला हे माहित असेलच की ते बनवताना भांड्यातून तीव्र वास येतो. पोषणतज्ञांच्या मते, तूप बनवताना त्यात तुळशीची पाने घातली तर तो उग्र वास तर दूर राहिलंच, पण त्यामध्ये काही आरोग्यदायी फायदेशीर घटकही समाविष्ट होतील. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते सामान्य फ्लू, श्वसनाच्या समस्या आणि ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर मानलं जातं.
कापूर आणि तूप :-
कापूर हा चवीला थोडा कडू असला तरी वात, पित्त आणि कफ या तिन्ही प्रकारच्या दोषांपासून मुक्त होण्याचे काम करतो. कापूर असलेले तूप आपले पचन सुधारण्याचं काम करतं. तसेच आतड्यांसंबंधी आरोग्य, ताप, हार्ट रेट आणि दमा यांसारख्या समस्यांमध्ये आराम देतं.
लसूण आणि तूप :-
गार्लिक बटर प्रमाणंच तुपासोबत लसूण सुगंध आणि चव दोन्ही वाढवतं. लसणात असलेले फायदेशीर घटक जळजळीशी संबंधित समस्येत आराम तर देतातच पण हाय ब्लड प्रेशरच्या च्या समस्येवरही फायदा देतात. याचं नियमित सेवन केल्याने शरीराला खूप फायदा होतो.
दालचिनी आणि तूप :-
दालचिनीमध्ये असलेले अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल घटक आपल्याला अनेक आजारांपासून वाचवतात. हे केवळ रक्तातील साखरेची पातळी कमी करत नाही तर पोटदुखीपासून देखील आराम देतं. एका कढईत थोडं तूप आणि दोन दालचिनीच्या काड्या मध्यम आचेवर 4-5 मिनिटे गरम करा आणि नंतर थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवा. ते दालचिनीची चव शोषून घेईल. हे शरीरासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितलं जातं.