शेतीशिवार टीम,18 डिसेंबर 2021:- दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी संघाच्या उपकर्णधारावरून सुरू असलेला सस्पेंस संपला आहे. ‘ANI’ शी बोलताना BCCIच्या एका सूत्राने सांगितले की, दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या जागी के एल राहुल आफ्रिका संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेत उपकर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे.
BCCI च्या निवड समितीनं यापूर्वी खराब फॉर्मात असलेल्या अजिंक्य रहाणेला हटवून रोहित शर्माला कसोटी टीम चा उपकर्णधार केलं होतं. परंतु मुंबईत बॅटींगचा सराव करताना रोहितच्या डाव्या पायाचे स्नायू दुखावले गेल्याने तो या दौऱ्यातून बाहेर पडला.त्यानंतर या जागेसाठी अनेक नावांची चर्चा सुरु झाली होती.
कसोटी संघाचा उपकर्णधार होण्यापूर्वी राहुलला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही संघाचा उपकर्णधार बनवण्यात आलं होतं. गेल्या काही वर्षांत तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणे हा यामागचा मुख्य भर आहे.
त्याने ही कामगिरी आयपीएलमध्येही सुरू ठेवली आहे, परंतु तो पंजाब किंग्जला प्लेऑफमध्ये पोहोचू नसला तरी ही त्याने बॅटने खूप धावा केल्या आहेत. रोहितच्या अनुपस्थितीत भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध राहुल आणि मयंक अग्रवाल ही सलामीच्या जोडी मैदानात उतारू शकतो.
रोहितच्या च्या जागी पांचाल ची निवड :-
रोहितच्या जागी पांचालची निवड केली असून तो राहुल आणि मयंक अग्रवाल ओपनरसाठी बॅकअप आहे. पांचालने देशांतर्गत क्रिकेटमधील एक प्रसिद्ध नाव आहे, जिथे त्याने 24 शतकांसह 100 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 7011 धावा केल्या आहेत. यामध्ये 24 शतके आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे.
पार्थिव पटेलच्या नेतृत्वाखालील रणजी करंडक विजेते गुजरात संघाचा तो सदस्य आहे. त्याने अलीकडेच भारत ‘अ’ संघाकडून खेळताना दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांचा सामना केला आणि 96 धावांची आकर्षक खेळी खेळली. मात्र, पांचाल येथे दुर्दैवी ठरला आणि अवघ्या चार धावांनी शतक झळकावण्यास तो हुकला होता.