Take a fresh look at your lifestyle.

Share Market : 2 रुपयांचा हा शेयर पोहचला 196 वर ; वर्षभरात 1 लाखांचे झाले 91 लाख, तुमच्याकडं आहे का ?

0

शेतीशिवार टीम,18 डिसेंबर 2021:- शेअर बाजाराबाबत एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की, जर तुम्ही हुशारीने गुंतवणूक केली तर चांगल्या परताव्याची वाट पाहणं केव्हाही फायदेशीर ठरतं. असाच काहीसा प्रकार ब्राइटकॉम ग्रुप (Brightcom Group)कंपनीच्या शेअर्सबाबत पाहायला मिळाला.

या मल्टिबॅगर penny stocks ने अवघ्या तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती केलं आहे. गेल्या 3 वर्षात या शेयर्सने 9000% रिटर्न्स दिले आहे.

काय आहे Brightcom Group कंपनीचा इतिहास :-

येत्या 10 / 12 दिवसांत नवं वर्ष सुरू होणार आहे. अशा स्थितीत सध्याचा कल लक्षात घेऊन गुंतवणूकदार या कंपनीवर विश्वास ठेवू शकतात. गेल्या आठवड्यात कंपनीच्या शेअरमध्ये 16% वाढ झाली आहे. 3 ट्रेड सेशनमध्ये 5 ट्रेड्समध्ये 5% वरचे सर्किट होते. तर गेल्या एका महिन्यात कंपनीचा शेअर 108 रुपयांवरून 195.90 रुपयांपर्यंत वाढला आहे.

जर आपण 6 महिने मागे गेलो तर या कंपनीच्या शेअरची किंमत 12.20 रुपये होती. म्हणजेच, तेव्हापासून ब्राइटकॉम ग्रुपने (Brightcom Group) 1500 % रिटर्न्स दिले आहे. तसं पाहिलं तर वर्षभरापूर्वी एका शेअरची किंमत फक्त 7 रुपये होती. तेव्हापासून, सुमारे 2700 % नफा गुंतवणूकदारांनी कमावला आहे.

2 जानेवारी 2019 रोजी ब्राइटकॉम ग्रुपच्या एका शेअरची राष्ट्रीय शेअर बाजारातील म्हणजेच निफ्टीची किंमत 2.16 रुपये होती. तर 17 डिसेंबर 2021 रोजी तो वाढून 195.90 रुपये झाला. तेव्हापासून आत्तापर्यंत या शेअरच्या किमतीत 9000% वाढ झाली आहे.

एक लाखाचे 91 लाख कसे झाले :-

जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिन्यापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज ते 1.80 लाख झाले असते. जर 6 महिन्यांपूर्वी कोणी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 16 लाख रुपये झाले असते.

एक वर्षापूर्वी कोणी एक लाख रुपये गुंतवले असते, तर आजच्या काळात ते 46 लाख रुपये झाले आहे. जेव्हा या कंपनीच्या शेअरची किंमत 2.16 रुपये होती, तेव्हा एखाद्या गुंतवणूकदाराने 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचा फंड 91 लाख रुपये झाला असता…

Leave A Reply

Your email address will not be published.