Share Market : मार्केट रोज कोसळतंय पण, ‘हे’ 3 शेयर्स करतायेत मालामाल ; पहा, पोर्टफोलिओमध्ये आहेत का ?
पुणे चौफेर टीम, 5 मार्च 2022 : गेल्या 8 दिवसांपासून रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम शेअर मार्केटवर होताना दिसून येत असून आज युद्धाच्या 8 व्या दिवशीही शेअर बाजारात घसरला आहे. निफ्टी 258 अंकांनी घसरून 16239 अंकांवर बंद झाला, तर सेन्सेक्समध्येही 818 अंकांची घसरण होऊन तो 54333 अंकांवर बंद झाला.
परंतु शेअर मार्केटमधील घसरणीदरम्यान, असे काही शेअर्स आहेत, ज्यांनी गेल्या तीन महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. शारदा क्रॉपकेम (Sharda Cropchem) गेल्या तीन महिन्यांत 81.76 टक्क्यांच्या वाढीसह गुरुवारी 568.10 रुपयांवर बंद झाला. तीन महिन्यांपूर्वी, स्टॉकची किंमत केवळ 312.55 रुपये होती.
दुसरीकडे, ओरिएंट रेफ्रेक्ट्रीज (Orient Refractories) गुरुवारी 534.30 रुपयांवर बंद झाला आणि तीन महिन्यांपूर्वी हा शेयर्स 339.15 रुपयांवर होता. तसेच जयप्रकाश हायड्रो (Jaiprakash Hydro) या कालावधीत 4.60 रुपयांवरून 7.20 रुपयांवर पोहोचला. या कालावधीत त्यात 56.52% वाढ नोंदवली गेली.
दीपक फर्टिलायझर (Deepak Fertilizer) हे गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून देणारे दुसरे नाव आहे. केमिकल स्टॉक गुरुवारी 580.65 रुपयांवर बंद झाला आणि तीन महिन्यांपूर्वी तो 372.30 रुपयांवर होता. या कालावधीत 55.96% रिटर्न्स दिला आहे.
मीडिया स्टॉक IBN 18 ने देखील आपल्या गुंतवणूकदारांना निराश केलं नाही. हा स्टॉक 3 महिन्यांत 50.24 टक्क्यांनी 41.40 रुपयांवरून 62.20 रुपयांवर गेला आहे. त्याच वेळी, ABB Power ने तीन महिन्यांत 1190.55 रुपयांनी म्हणजेच 44.72 टक्क्यांनी 3852.70 रुपयांपर्यंत झेप घेतली आहे. तीन महिन्यांपूर्वी तो 2662.15 रुपये होता.
दुसरा स्टॉक हिंदाल्को इंडस (Hindalco Indus) आहे. या शेयर्सने तीन महिन्यांत 42.78% रिटर्न्स दिले आहे. गुरुवारी तो 606.30 रुपयांवर बंद झाला आणि तीन महिन्यांपूर्वी तो 424.65 रुपयांवर होता. पेनी स्टॉक सुझलॉन एनर्जी (Suzlon Energy) देखील तीन महिन्यांत 41:43 टक्क्यांनी वाढून 9.90 रुपयांवर पोहोचला आहे.
राकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ स्टॉक नॅशनल अँल्युमिनियम (National Aluminum) देखील 3 महिन्यांपूर्वी फक्त 91.70 रुपयांच्या तुलनेत गुरुवारी 129.00 रुपयांवर बंद झाला. या दरम्यान तो 40.68 टक्क्यांनी वाढला आणि आता तो 150 रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.