Take a fresh look at your lifestyle.

भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या टॉप 10 CNG कार !

0

शेतीशिवार टीम : 27 मार्च 2022 :- पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे अलीकडच्या काही महिन्यांत सीएनजी (CNG) कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे. तसेच या वाढत्या महागाईच्या काळात महाराष्ट्रातील सीएनजी वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण 1 एप्रिल 2022 पासून राज्यातील CNG च्या दरांत मोठी घट होणार असून CNG वरील VAT 13.5% वरून 3% करण्याचा निर्णय घेतल्याने आता CNG च्या दारात प्रति किलो 5.75 ते 8.00 रुपयापर्यंत कपात होणार आहे.

सध्या भारतात CNG चे अशे अनेक मॉडेल्स आहेत त्यावर 6 महिन्यांपर्यंतचा व्हेटिंग पिरियड दिला आहे. मारुती सुझुकी (Maruti Suzuki)आणि ह्युंदाई (Hyundai) आधीच त्यांचे सीएनजी मॉडेल विकत आहेत, आता टाटा मोटर्सने (Tata Motors) देखील या सेगमेंटमध्ये प्रवेश केला असून त्यांनाही त्यांचे टाटा टिगोर (Tata Tigor) आणि टियागो (Tata Tiago) च्या दोन कार फॅक्ट्री फिटेड सीएनजी (CNG) मॉडेल्स लॉन्च केले आहेत. आता आपण CNG वर सर्वाधिक मायलेज देणाऱ्या वाहनांबद्दल जाणून घेऊयात…

मारुती डिझायर (Maruti Dzire CNG) (31.12 km/kg) :- 

मारुती डिझायर सीएनजीच्या (Maruti Dzire CNG) किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, मारुती डिझायर ( VXI CNG 1197 cc | Manual | CNG) सीएनजीची (CNG) किंमत 8.14 लाख रुपये (एक्स शोरूम) आणि मारुती डिझायर (ZXI CNG 1197 cc | Manual | CNG) सीएनजी 8.82 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे.

या व्हेरियंटला 1.2-लिटर K-Series Dualjet इंजिन दिलं गेलं आहे. जे 71bhp पर्यंत पॉवर आणि 98.5Nm टॉर्क जनरेट करते. मारुती डिझायर CNG मायलेज 31.12km/kg पर्यंत आहे आणि सेडान विभागात सर्वोत्तम मायलेज देणारी CNG कार आहे.

मारुती सुझुकी S-presso CNG (31.2km/kg) :-

Maruti S-Presso CNG ची CNG किंमत रु. 5.24 पासून सुरू होते आणि रु. 5.56 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. मारुती सुझुकी S-presso मध्ये 1.0-लिटर इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन CNG मोडवर 58hp पॉवर आणि 78Nm टॉर्क जनरेट करते. हे CNG वाहन 31km/kg पर्यंत मायलेज देते.

मारुती सुझुकी Alto 800 CNG (31.59km/kg) :-

सीएनजीवरील मायलेजच्या बाबतीत मारुती सुझुकी अल्टोचे नाव सर्वात किफायतशीर कारमध्ये समाविष्ट आहे. सीएनजी व्हेरिएंट अल्टो कार 31.59 km/kg पर्यंत मायलेज देते. मारुती सुझुकी अल्टो 796 cc, 3 सिलिंडर F8D इंजिनद्वारे समर्थित आहे. CNG व्हेरियंटची सुरुवातीची किंमत 4,76,500 रुपये (एक्स-शोरूम) आहे.

मारुती सुझुकी Celerio CNG (35.60km/kg) :- 

मारुती सेलेरियो सीएनजी (CNG) 1 किलो गॅसमध्ये 35.60 किमी मायलेज देते. हे 1.0-लिटर K10C DualJet इंजिनद्वारे समर्थित आहे जे CNG सह 57hp कमाल पॉवर आणि 82.1Nm पीक टॉर्क निर्माण करते. कंपनीने हे फक्त 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह लॉन्च केले आहे. Celerio VXi CNG ची एक्स-शोरूम किंमत रु. 6,58,000 आहे.

10 सर्वात जास्त विकणाऱ्या CNG कारची संपूर्ण लिस्ट | जाणून घ्या, डिटेल्स… 

क्र. CNG मॉडलचे नाव किंमत (Rs.)
मारुती सुझुकी Alto 800 4. 33 लाख
मारुती सुझुकी Wagon R 5. 25 लाख
मारुती सुझुकी Ertiga 8.95 लाख
मारुती सुझुकी EECO 4.95 लाख
ह्यूंदाई Santro 5.84 लाख
ह्यूंदाई ग्रँड i10 Nios 6.64 लाख
ह्यूंदाई Aura 7.28 लाख
मारुती सुजुकी Celerio 4.41 लाख
मारुती S-presso 4.84 लाख
१० बजाज Qute 2.83 लाख

 

Leave A Reply

Your email address will not be published.