शेतीशिवार टीम, 22 जानेवारी 2022 : भारतात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत असले तरीही आयपीएलचे (IPL) नियोजन हे भारतातच होणार असल्याची पुष्टी नियामक मंडळाच्या सर्वोच्च सूत्रांनी पुष्टी केली आहे. अशा परिस्थितीत प्राधिकरणाने आयपीएल 2022 साठी (IPL 2022) योजना तयार केल्या आहेत, ज्याची माहिती त्यांनी शनिवारी (22 जानेवारी) झालेल्या बैठकीत फ्रेंचायझीच्या मालकांना दिली आहे. 

या बैठकीत प्राधिकरणाने सांगितलं आहे की, आयपीएल मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून भारतात आयोजित केली केली जाणार असून ती मे च्या अखेरपर्यंत खेळवली जाणार आहे. आयपीएलचा (IPL) पहिला सामना 27 मार्चला होणार आहे.

परंतु आयपीएलचे सामने हे प्रेक्षकांशिवाय होणार आहे. IPL 2022 साठी संभाव्य ठिकाणे म्हणजे वानखेडे स्टेडियम, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI), मुंबईतील DY पाटील स्टेडियम आणि गरज पडल्यास काही सामने पुण्यातही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि जर आयपीएल (IPL) दरम्यान कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली तर प्लेऑफचे सामने अहमदाबादमध्ये खेळवले जाणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज आयपीएल 2022 च्या मेगा लिलावासाठी 1214 खेळाडूंची नोंदणी जाहीर केली. आयपीएल 2022 च्या दोन दिवसांच्या मेगा लिलावात 10 संघ या खेळाडूंसाठी बोली लावली आहे.

बीसीसीआयचे महासचिव जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, मेगा लिलावासाठी खेळाडूंची नोंदणी 20 जानेवारी 2022 रोजी बंद झाली असून एकूण 1214 खेळाडूंनी (896 भारतीय आणि 318 विदेशी) आयपीएल 2022 मेगा लिलावाचा भाग असणार आहे.

खेळाडूंच्या यादीमध्ये 270 कॅप्ड, 903 अनकॅप्ड आणि 41 सहयोगी खेळाडू (318 परदेशी खेळाडूंसह) समाविष्ट आहेत. मेगा लिलावापूर्वी एकूण 33 खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे. विद्यमान आठ आयपीएल फ्रँचायझींनी एकूण 27 खेळाडूंना कायम ठेवले आहे, तर दोन नवीन संघांनी लिलावापूर्वी सहा खेळाडूंची निवड केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *