शेतीशिवार टीम, 18 जानेवारी 2022 : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधारासाठी 2021 हे वर्ष बॅटिंगच्या बाबतीत इतकं खास राहिलं नसून गेल्या वर्षी त्याच्या बॅटमधून एकही शतक झळकलेलं नाही, तर त्याच्या नेतृत्वाखालील IPL मधील आरसीबीची (RCB) कामगिरी अजिबात संस्मरणीय नव्हती.

याशिवाय भारतीय संघ गेल्यावर्षी वर्षी टी-20 वर्ल्डकपच्या (T-20 World Cup) उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नव्हता. त्यामुळे विराट आणि त्याच्या चाहत्यांना 2021 हे वर्ष विसरायला लागेल.

एवढे सगळे असूनही विराट कोहली हा भारतीय क्रिकेटचा स्टार आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लाखो चाहते त्याला फॉलो करतात. याच कारणामुळे हे स्टार फलंदाज 2021 मध्ये इंस्टाग्रामवरून (Instagram) सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय प्रभावशाली व्यक्तींमध्ये अव्वल स्थानावर आहेत.

HopperHQ नुसार, विराट कोहली 2021 मध्ये इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा भारतीय प्रभावशाली व्यक्ती ठरला आहे. संपूर्ण जगात इंस्टाग्रामवरून सर्वाधिक कमाई करणार्‍यांच्या यादीत त्याचा नंबर 19 व्या स्थानावर आहे.

HopperHQ च्या रिपोर्टनुसार, भारतीय संघाच्या या स्टार फलंदाजाने इंस्टाग्रामवरून (Instagram) जवळपास प्रत्येक पोस्टवर 5 कोटी रुपये कमावले आहेत. त्‍यामुळे त्‍याने गतवर्षी भारतातील इंस्‍टाग्रामवरील सर्वाधिक कमाई करणार्‍यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे.

विराट कोहलीने नुकतीच भारतीय क्रिकेट संघाच्या कसोटी कर्णधारपदावरून निवृत्ती जाहीर केली. यापूर्वी त्याने गेल्या वर्षी आयपीएल संघ आरसीबी आणि टी-20 क्रिकेटमधून भारतीय संघाचे कर्णधारपदही सोडले होतं.

टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआयने विराट कोहलीकडून एकदिवसीय क्रिकेटच कर्णधारपद काढून घेतलं. अन् आता त्याने टेस्ट क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *