ZP Bharti 2023 : पुण्यात तब्बल 1,000 तर नगरमध्ये 937 जागा, ग्रामसेवकासह गट-क संवर्गातील 21 पदे, पहा ऑनलाईन अर्ज लिंक..
गेल्या चार वर्षांपासून चर्चेत असलेल्या पुणे – अहमदनगर जिल्हा परिषद भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. पुणे जिल्हा परिषदेत गट – क संवर्गातील 21 पदांच्या तब्बल 1,000 जागांसाठी तर अहमदनगर जिल्ह्यासाठी 937 रिक्त रिक्तपदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
त्यासाठी आज शनिवार (दि. 5) ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. जिल्हा परिषदेतील सरळ सेवा भरतीची सविस्तर माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) राहुल गावडे यांनी दिली.
यापूर्वी 2019 मध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, ही भरती प्रक्रिया मध्यंतरीच स्थगित केली. त्यामुळे हजारो उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी होती. त्यानंतर प्रत्यक्षात पुन्हा एकदा भरती प्रक्रिया सुरू होत असल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या भरती अंतर्गत ग्रामसेवकासह आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज करण्यासाठी 5 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट अशी मुदत दिल आहे. ऑनलाइन अर्ज पुणे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर करावे लागणार आहेत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1 हजार तर मागासवर्गीय गटासाठी 900 रुपये अर्ज शुल्क आहे.
अर्ज आणि पदाची सर्व माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ज्या उमेदवारांना रिक्त पदांचा तपशिल, शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इ. बाबत माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली जिल्हानिहाय PDF डाउनलोड करा.
अर्जासाठी लिंक : ibpsonline.ibps.in.zpvpiun23
पुणे जिल्हा परिषद भरती PDF जाहिरात :- इथे क्लिक करा
अहमदनगर जिल्हा परिषद भरती PDF जाहिरात :- इथे क्लिक करा
सर्व जिल्ह्यांच्या कुठे किती जागा ? पहाण्यासाठी :- इथे क्लिक करा