Electric car खरेदी करताय फक्त 19 दिवस कळ काढा ; 6 सप्टेंबरला लॉन्च होणार 400Km रेंजवाली SUV ; थेट देणार TATA ला टक्कर ; पहा डिटेल्स

0

शेतीशिवार टीम : 19 ऑगस्ट 2022 :- महिंद्र येत्या दोन वर्षात भारतीय बाजारपेठेत अनेक इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करणार आहे. मात्र, याआधी कंपनी मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. महिंद्र आपली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक XUV-400 SUV पुढील महिन्यात 6 सप्टेंबरला म्हणजेच 19 दिवसांनंतर लाँच करणार आहे.

लॉन्चसह कंपनी विक्री देखील सुरू करेल. विशेष बाब म्हणजे ही सब-फोर मीटर कॅटेगरीपेक्षा लांब कार आहे. त्याची लांबी 4.2 मीटर आहे. महिंद्राच्या सब-कॉम्पॅक्ट SUV XUV300 चे हे इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. भारतीय बाजारपेठेत या SUV ची थेट टक्कर टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्सशी Tata Nexon EV Max होईल.

2020 मध्ये कॉन्सेप्ट केली होती लॉन्च :-

महिंद्राने ऑटो एक्सपो – 2020 मध्ये प्रथम XUV400 इलेक्ट्रिक SUV लॉन्च केली. परंतु, ही एक कॉन्सेप्ट डिझाईन होती. कॉन्सेप्ट मॉडेलच्या तुलनेत फायनल डिझाइनमध्ये काही बदल केले जाऊ शकतात,असं मानलं जातं. कॉन्सेप्ट मॉडेलचे बहुतेक डिझाइन एलिमेंट्स राखले जातील. XUV400 ला क्लोज-ऑफ फ्रंट ग्रिल, इंटिग्रेटेड डीआरएलसह पुन्हा डिझाइन केलेले हेडलॅम्प, रिव्हाइज्ड टेलगेट आणि नवीन टेललॅम्प क्लस्टर मिळतात. यामध्ये अधिक बूट स्पेस मिळेल. त्याची रुंदी, उंची आणि व्हीलबेसमध्ये कोणताही बदल होणार नाही…

400km पेक्षा जास्त रेंज असण्याचा अंदाज :-

Mahindra XUV400 ला ब्रँडच्या Adreno X Connected Car AI टेक्नॉलॉजीसह मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये ADAS (Advanced Driver Assistance System) फीचर्स देखील दिले जाऊ शकते. महिंद्र आता आपल्या SUV मध्ये हे फीचर्स वापरत आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये कंपनी हाय एनर्जी डेन्सिटी एनएमसी (High Energy Density NMC) बॅटरी वापरणार असल्याचे मानलं जात आहे. हे बॅटरी सेल टाटाच्या नेक्सॉन EV मध्ये वापरल्या जाणार्‍या सिलिंड्रिकल LFP सेलपेक्षा चांगले आहेत. NMC बॅटरीला जास्त पॉवर मिळेल आणि जास्त अंतर कापण्यासही सक्षम असेल. ही एका चार्जवर 400km पेक्षा जास्त रेंज देऊ शकते.

Tata Nexon EV Max शी होणार थेट स्पर्धा :-

Mahindra XUV400 इलेक्ट्रिक SUV शी संबंधित काही रिपोर्ट्सनुसार, ती दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च केली जाईल. यामध्ये एक रेगुलर असेल आणि लॉन्ग डिस्टेंससाठी असणार आहे. नियमित मॉडेल टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्सशी स्पर्धा करेल. तसेच, लॉन्ग डिस्टेंसच्या मॉडेलची MG ZS EV आणि Hyundai Kona सोबत स्पर्धा होण्याची अपेक्षा आहे. परंतु, महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिकची किंमत काय ठरवते हे देखील पाहावं लागेल. Nexon EV Max ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 18 लाख रुपये आहे.

महिंद्राने 5 नवीन इलेक्ट्रिक SUV वरून हटवला पडदा :- 

महिंद्रा अँड महिंद्राने 15 ऑगस्ट रोजी 5 नवीन इलेक्ट्रिक SUVs – XUV.e8, XUV.e9, BE.05, BE.07 आणि BE.09 वरून पडदा हटवला. या इलेक्ट्रिक SUV 2024 पासून भारतीय बाजारपेठेत लॉन्च केल्या जातील. तसेच, त्याची BE रेंज 2025 मध्ये भारतात विक्रीसाठी आणली जाईल. या सर्व 5 इलेक्ट्रिक SUV प्लॅटफॉर्म आणि बॅटरी मॉड्यूल शेयर केल्या जातील. प्रॉडक्शनमध्ये जाणारे पहिले महिंद्राचे बॉर्न इलेक्ट्रिक मॉडेल XUV.e8 असेल. हे मॉडेल डिसेंबर 2024 मध्ये देशात लॉन्च केलं जाऊ शकतं.

Leave A Reply

Your email address will not be published.