शेतीशिवार टीम, 4 मार्च 2022 : MG Motor India ची इलेक्ट्रिक ZS EV चे फेसलिफ्ट मॉडेल कधी येणार ? यासाठी अनेक ग्राहक वेटिंगवर असून अखेर MG Motor ने आपल्या इलेक्ट्रिक कार ZS EV चे फेसलिफ्ट मॉडेल 7 मार्च रोजी लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे.
लॉन्च करण्यापूर्वी कंपनी एक-एक करून आपल्या जबरदस्त फीचर्सचा खुलासा करताना दिसून येत आहे. ताज्या निवेदनात, कंपनीने म्हटले असं म्हटलं आहे की, ZS EV फेसलिफ्टमध्ये i-SMART तंत्रज्ञान देण्यात आलं आहे, ज्याद्वारे कारमध्ये 75 हून अधिक कनेक्टेड फीचर्स दिले जातील. Jio, Park+, MapMyIndia आणि Shortpedia सारख्या पार्टनर्स सर्व्हिस देखील वाहनात दिल्या जातील.
MapMyIndia चं एडवांस 4D मॅप्सद्वारे ग्राहकांना ऑनलाइन नेव्हिगेशन आणि लाईव्ह ट्रॅफिक अपडेट प्रदान करणार आहे.दुसरीकडे, Park+ युजर्सना आपल्या स्थानावर पोहोचण्यापूर्वी पार्किंग स्लॉटसाठी प्री-बुक आणि प्री-पे करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
मनोरंजनासाठी, ग्राहक JioSaavn च्या म्युझिक आणि पॉडकास्ट स्ट्रीमिंग सर्व्हिसचा आनंद घेऊ शकतात. तर शॉर्टपीडिया द्वारे इंग्रजी आणि हिंदीमध्ये ताज्या बातम्या वाचता किंवा ऐकू शकता…
480KM पर्यंत रेंज…
नवीन कारमध्ये पॉवरट्रेन अपग्रेड केली जात आहे. नवीन MG ZS EV ला अधिक रेंज सह मोठा बॅटरी पॅक मिळणार आहे.सध्याच्या ZS EV ला 44.5kWh लिथियम-आयन बॅटरी मिळते, तर फेसलिफ्ट केलेल्या मॉडेलमध्ये 51kWh बॅटरी असू शकते.
नवीन बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 480 Km पर्यंतची रेंज देऊ शकते. मात्र, पॉवर फिगरमध्ये कोणताही बदल होणार नाही. सध्याचे मॉडेल 143 एचपी पॉवर आणि 353 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

360 डिग्री कॅमेरा सारखे फीचर्स…
कंपनी नवीन ZS EV च्या फीचर्समध्येही अनेक बदल करणार आहे. आता जुन्या 8.0-इंच युनिटच्या जागी 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि अँनालॉग डायल्सच्या जागी एक नवीन 7.0-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल. याव्यतिरिक्त, यात ADAS सिस्टम आणि 360-डिग्री कॅमेरा देखील मिळेल. ADAS सिस्टम साठी, ते MG Aster प्रमाणेच कॅमेरा आणि रडार सेटअप वापरला आहे.
किंमत :- MG मोटर्सची ZS EV माँडेलची एक्स-शोरूम किंमत 22 ते 26 लाख रुपये असू शकते.