शेतीशिवार टीम, 3 मार्च 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.
खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.
प्रश्न : असं कोणतं एअरपोर्ट आहे, ज्या एअरपोर्टच्या रनवे मधून रेल्वे धावते ?
उत्तर : न्यूझीलंडचे “गिसबॉर्न एअरपोर्ट” हे जगातील असं विमानतळ आहे, ज्याच्या रनवे मधून रेल्वे धावते. या ठिकाणी सकाळी 6:30 ते रात्री 8:30 पर्यंत रेल्वे मार्ग अन् रनवे व्यस्त असतो.
प्रश्न : जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट सुविधा कोणता देश पुरवतो?
उत्तर : “इस्रायल” हा असा देश आहे, जो जगातील सर्वात कमी किमतीत इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. येथे एक जीबी डेटाची (1 GB) किंमत फक्त तीन रुपये पंचाहत्तर पैसे आहे.
प्रश्न : भारतात पहिली FIR केव्हा आणि कोणत्या ठाण्यात नोंदवली गेली ?
उत्तर : भारतातील पहिली एफआयआर (FIR) 18 ऑक्टोबर 1861 रोजी दिल्लीतील ठाणे डिफेन्स कॉलनी स्टेशनवर उर्दू भाषेत नोंदवली गेली. आणि ही एफआयआर (FIR) भांडी चोरी केल्याबद्दल होती…
प्रश्न : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे किती पदव्या होत्या ?
उत्तर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण 32 पदव्या होत्या. आणि अर्थशास्त्रात पीएचडीसाठी परदेशात जाणारे ते पहिले भारतीय होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शैक्षणिक पात्रता :
1907 मध्ये मॅट्रिक, एल्फिन्स्टन हायस्कूल, बॉम्बे पर्शियन.
इंटर, 1909, एल्फिन्स्टन कोलाज, बॉम्बे पर्शियन.
बीए, 1913, एल्फिन्स्टन कोलाज, बॉम्बे पर्शियन.
M.A, 1915 समाजशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान, मानववंशशास्त्र आणि राजकारणासह अर्थशास्त्रात प्रमुख.
कोलंबिया विद्यापीठातून पीएचडी, 1917.
M.Sc, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून 1921.
बॅरिस्टर अँटलॉ, ग्रेज इन, लंडन येथून 1920.
D.SC, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन येथून 1923.
एलएलडी, 1952 कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्कमधून.
डी. लिट, 1953 उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद येथून.
प्रश्न : इतिहासातील सर्वात लहान युद्ध कोणत्या दोन देशांदरम्यान झालं? आणि ते किती काळ टिकलं?
उत्तर : इतिहासातील सर्वात लहान युद्ध 27 अगस्त, 1896 साली इंग्लंड आणि जंज़ीबार यांच्यात झालं, ज्यामध्ये जंज़ीबारने केवळ 38 मिनिटांत पराभव स्वीकारला आणि शरणागती पत्करली…
प्रश्न : जन्मतः नवजात बाळ कोण- कोणते रंग पाहू शकतो ?
उत्तर: नवजात बाळाला जन्मानंतर काही आठवडे फक्त काळा आणि पांढरा रंगच दिसतो. आणि काही आठवड्यांनंतर, जेव्हा त्यांना कोणताही रंग दिसतो, तेव्हा पहिला रंग लाल असतो. जन्मानंतर एक आठवड्यानंतर तो लाल, केशरी, पिवळा आणि हिरवा रंग पाहू शकतो. पण त्याला निळा आणि जांभळा रंग दिसायला थोडा जास्त वेळ लागतो…
प्रश्न : भारतातील सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे ?
उत्तर : श्रीनगर ते कन्याकुमारी यांना जोडणारा 3745 किमी लांबीचा NH-44 हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे.
प्रश्न : जगातील सर्वात तरुण महिला पंतप्रधान कोण आहेत ? आणि ती कोणत्या देशाची पंतप्रधान आहे ?
उत्तर : फिनलंडच्या ‘साना मरीन’ ही सर्वात तरुण पंतप्रधान बनणारी पहिली महिला आहे. त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचे वय अवघे 34 वर्षे होते.
प्रश्न: भारतातील पाहिलं प्रायव्हेट रेल्वे स्टेशन कोठे आहे अन् त्याचे नाव काय आहे ?
उत्तर: भारतातील पहिले खाजगी रेल्वे स्टेशन भोपाळ जिल्ह्यात असून त्याचे नाव ‘हबीब गंज रेल्वे स्टेशन’ आहे.
प्रश्न : जगातील पहिला एकदिवसीय सामना कधी आणि कुठे खेळला गेला ?
उत्तरः ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 5 जानेवारी 1971 रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला.
प्रश्न : भारतातील सर्वात लांब धावणारी ट्रेन कोणती आहे ?
उत्तर : दिब्रुगढ कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस – भारतीय रेल्वेच्या मते, ही ट्रेन भारतातील सर्वात लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. ही ट्रेन दिब्रुगढ ते कन्याकुमारी 4247 किमी अंतर 82.50 तासांत कापते. प्रवासादरम्यान ही ट्रेन 57 स्थानकांवर थांबते…
प्रश्न : ऑट्टोमन साम्राज्याचं (Ottoman Empire) पतन कोणत्या वर्षी झालं ?
उत्तर : 1917 मध्ये पहिल्या महायुद्धानंतर,ऑट्टोमन साम्राज्याचं (Ottoman Empire) पतन झालं आणि नंतर ब्रिटनने पॅलेस्टाईनचा ताबा घेतला.
प्रश्न : भारतातील पहिलं अँप्युटी क्लिनिक (First ever amputee clinic) कोणी उघडलं ?
उत्तर : भारतातील पहिले अँप्युटी क्लिनिक (First ever amputee clinic) पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, चंदीगडने उघडलं आहे.
प्रश्न : मिस युनिव्हर्स 2020 चा ‘किताब कोणी जिंकला ?
उत्तर : मिस मेक्सिको अँड्रिया मेझा (Andrea Meza) ने मिस युनिव्हर्स 2020 चा किताब जिंकला.
प्रश्न : भारतातील सर्वात जास्त क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प कोणता आहे ?
उत्तर : तामिळनाडूमधील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प हा भारतातील 2000 मेगावॅट क्षमतेचा सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे.
प्रश्न : आशियातील पहिली अणुभट्टी कोणती होती ?
उत्तर : आशियातील पहिल्या अणुभट्टीला ‘अप्सरा’ म्हणतात. हे 4 ऑगस्ट 1956 रोजी भाभा अणु संशोधन केंद्राच्या ट्रॉम्बे कॅम्पसमध्ये बांधले गेले. BARC च्या वेबसाइटनुसार, त्याचे उद्घाटन 20 जानेवारी 1957 रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आलं.
प्रश्न : अनुशीलन समितीचे संस्थापक कोण होते ?
उत्तर : अनुशीलन समितीची स्थापना बरिंद्र कुमार घोष आणि जतींद्रनाथ बॅनर्जी यांनी केली होती.
प्रश्न : जालियनवाला बाग घटना कधी घडली ?
उत्तर : जालियनवाला बाग हत्याकांड, ज्याला ‘अमृतसर नरसंहार’ असेही म्हणतात, 13 एप्रिल 1919 रोजी घडलं .
प्रश्न : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरलं होतं ?
उत्तर : INC चे पहिले अधिवेशन 28-30 डिसेंबर 1885 दरम्यान मुंबई येथे झालं.
प्रश्न : जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : जागतिक जल दिन दरवर्षी 22 मार्च रोजी साजरा केला जातो.
प्रश्न : आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कधी साजरा केला जातो ?
उत्तर : 21 सप्टेंबर
प्रश्न : असा कोणता जीव आहे, त्याला एकही हाड नाही ?
उत्तर : शार्क माशाच्या (Shark fish) शरीरात हाड नसतं.
प्रश्न : फाशी दिल्यानंतर आरोपीच्या मृतदेहाचे काय केलं जातं ?
उत्तर : आरोपीला फाशी दिल्यानंतर गुन्हेगाराला कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दोन तास फासावर लटकवलं जाते. 2 तासानंतर वैद्यकीय पथक मृतदेहाची तपासणी करून त्याला मृत घोषित करतात. त्यानंतर त्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात येतं. यानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवायचा की नाही ? हे सरकारवर अवलंबून असतं.
प्रश्न : असा कोणता प्रश्न आहे, त्याचं उत्तर नेहमी बदलत राहतं ?
उत्तर : वेळ किती झाली आहे ? या प्रश्नाचे उत्तर नेहमी बदलत राहतं ?
प्रश्न : 500 / 2000 रुपयांच्या नोटा छापण्यासाठी RBI ला किती खर्च येतो ?
उत्तर : रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात सांगितलं आहे की, 2000 रुपयांची नोट छापण्यासाठी सरकारला 4.18 रुपये खर्च येतो. 500 रुपयांची नोट छापण्यासाठी 2.57 रुपये खर्च येतो. तर 100 रुपयांची नोट छापण्यासाठी 1.51 रुपये खर्च येतो.
प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे, जी पुरुषाने एकदा केल्यानंतर स्त्री पुन्हा-पुन्हा करते ?
उत्तर : भांगेत सिंदूर भरणं.