Take a fresh look at your lifestyle.

सगळ्यात स्वस्त जबरदस्त SUV, किंमत फक्त 5.76 रु.पासून सुरु…

0

शेतीशिवार टीम, 15 मार्च 2022 : गेल्या एका वर्षात SUV सेगमेंट कार्स झपाट्याने वाढल्या आहे आणि अनेक कंपन्यांनी त्यांची SUV कार मार्केटमध्ये उतरल्या आहेत. बाजारात परवडणाऱ्या अनेक एसयूव्ही (SUV) आहेत.

आज आपण अशाच एका स्वस्तात परवडणाऱ्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीबद्दल (SUV) जाणून घेणार आहोत.ज्याची किंमत 6 लाखांपेक्षा कमी तर आहेतच पण यासोबतच ती 20Kmpl पर्यंत मायलेज देतं आहे.

आपण ज्या SUV बद्दल बोलत आहोत ती निसान मॅग्नाइट (Nissan Magnite) आहे. सुरक्षेबद्दल बोलायचं झालं तर, याला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार सुरक्षा रेटिंग मिळालं आहे.

Nissan Magnite च्या इंजिन आणि मायलेजबद्दल जाणून घेऊयात…

Nissan Magnite SUV एकूण 6 ट्रिम्स XE, XL, XV Executive, XV, XV Premium आणि XV Premium (O) मध्ये येते. त्याची किंमत 5.76 लाख रुपये ते 10.24 लाखांपर्यंत आहे. ही SUV दोन पेट्रोल इंजिन आणि अनेक फीचर्ससह येते. ही नॅच्युरली एस्पिरेटेड 1-लिटर (72PS/96Nm) आणि 1-लिटर टर्बो-पेट्रोल (100PS/160Nm) इंजिनद्वारे समर्थित आहे.

पहिलं इंजिन फक्त 5-स्पीड MT शी जोडलेलं आहे आणि दुसरं इंजिन 5-स्पीड MT आहे जे सीव्हीटी ट्रांसमिशनला देखील जोडलेलं आहे. पाहिलं इंजिन 18.75 kmpl आणि दुसरं इंजिन 20.0 kmpl पर्यंत मायलेज देतं.

कसा आहे SUV चा लूक…

यात Z-शेपचे DRLs सह LED ड्युअल-प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि खालच्या साईडला LED फॉग्लॅम्प्स मिळतात. बाजूला, तुम्हाला ORVM वर 16-इंच टायर, फंक्शनल रूफ रेल आणि टर्न इंडिकेटर मिळतात.

मागील डिफॉगरसह रियर-व्ह्यू कॅमेरा, पार्किंग सेन्सर मागील बाजूस उपलब्ध आहे. कारमध्ये 360° कॅमेरा आहे, एवढे फीचर्स असताना यामध्ये सनरुफचा अभाव आहे. ही SUV, Kia Sonet, Hyundai Venue, Maruti Vitara Brezza आणि Renault Kiger सारख्या वाहनांशी थेट स्पर्धा करताना दिसून येत आहे.

फीचर्स इतके की तुम्हीच पहा… 

Interior बद्दल बोलायचे झाले तर, 8-इंचाची इन्फोटेनमेंट टचस्क्रीन आहे जी वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करते. कारमध्ये कप आणि बॉटल होल्डर, 10-लिटर ग्लोव्ह बॉक्स, सेंटर आर्मरेस्ट स्टोरेज यांसारखे बरेच स्टोरेज कंपार्टमेंट्स देखील मिळतात. स्टीयरिंग व्हीलवर ऑडिओ, व्हॉइस असिस्टंट, क्रूझ फंक्शन आणि टेलिफोन कंट्रोल स्विचेस आहेत.

इन्स्ट्रुमेंट क्लस्टरच्या स्वरूपात 7-इंचाचा डिस्प्ले आहे. सेफ्टी फीचर्समध्ये ड्युअल एअरबॅग्ज आणि EBD सह ABS, अँटी-रोल बार, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, हायड्रॉलिक ब्रेक असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि कीलेस एंट्री यांचा समावेश असल्याने ही SUV ग्राहकांच्या पसंतीत उतरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.