शेतीशिवार टीम : 8 जुलै 2022 :- भारतीय लष्कराने सुरू केलेल्या अग्निपथ योजनेसाठी भारतीय नौदल आणि लष्कराने 1 जुलैपासून अग्निपथ योजना नोंदणी : 2022 प्रक्रिया सुरू केली आहे. यासोबतच भारतीय लष्कराने विविध राज्यांसाठी भरती मेळावा योजनाही जाहीर केली आहे.
अग्निपथ योजना नोंदणी : 2022 साठी, उमेदवार ऑनलाइनद्वारे स्वतःची नोंदणी करू शकतात. अग्निपथ योजनेंतर्गत, आता अग्निपथ योजनेची नोंदणी प्रक्रिया भारतीय लष्कराच्या दोन शाखांसाठी (Army and Navy) सुरू आहे.
आता महाराष्ट्र राज्यात अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निविरांसाठी भरती जाहीर झाली आहे. यामध्ये प्रथम अहमदनगर जिल्ह्यातील महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात अग्नीवर मेळावा 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात पुणे, बीड, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर या 6 जिल्ह्यातील उमेदवारांना संधी मिळणार आहे,
आता या पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात कौसा व्हॅली संकुलातील माननीय श्री अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडीयम येथे 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2022 या कालावधीत अग्निपथ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक,रायगड, पालघर, ठाणे, नंदुरबार, धुळे या 8 जिल्ह्यातील उमेदवारांना संधी मिळणार आहे.
पोस्ट :-
या मेळाव्यामध्ये अग्निवीर सामान्य सेवा, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक / भांडार व्यवस्थापक तांत्रिक,अग्निवीर कुशल कारागीर ( दहावी उत्तीर्ण ), अग्निवीर कुशल कारागीर (आठवी उत्तीर्ण) या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
अर्ज आणि भरती प्रक्रिया :-
अग्निपथ योजनेअंर्तगत इच्छुक उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या व्हेबसाईवर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज भरल्यानंतरच तुम्हाला रजिस्टर्ड email ID नोंदणी फॉर्म मिळणार आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांची जिल्हा आणि तहसील पातळीवर संभाव्य उमेदवारांची छाननी केल्यानंतरच प्रवेश मिळणार आहे.
3 टप्प्यात होणार भरती :-
शारीरिक क्षमता चाचणी (Physical Ability Test) , वैद्यकीय चाचणी (Medical test) आणि सामायिक प्रवेश परीक्षा (Written Exam – CEE). शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नोव्हेंबर : 2022 मध्ये होणारी लेखी परीक्षा होणार आहे.
या सर्व परीक्षा पास केल्यानंतर अंतिम टेस्ट मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना देशसेवेसाठी अग्निवीर म्हणून भारतीय लष्करात भर्ती होण्याबाबतचे पत्र देण्यात येणार आहे.
यासंदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर लॉगीन करावे अथवा 022-22153510 या क्रमांकावर थेट संपर्क साधावा…