शेतीशिवार टीम : 8 जुलै 2022 :- या महिन्यात मारुती, ह्युंदाई, महिंद्रा, सिट्रॉन आणि ऑडी या कंपन्यांची वाहने भारतीय मार्केटमध्ये दाखल होणार आहेत. नवीन ऑडी ए8 एल (Audi A8 L) सेडान या महिन्याच्या 12 तारखेला भारतीय मार्केटमध्ये दाखल होणार आहे, आणि न्यू जनरेशन Hyundai Tucson 13 तारखेला भारतीय मार्केटमध्ये अवतरणार आहे. तसेच, महिंद्रा 21 जुलै रोजी नवीन Scorpio N ऑटोमॅटिक वेरिएंटच्या किमती जाहीर करणार आहे.

तर 20 जुलै रोजी दोन मोठ्या Cars भारतीय मार्केटमध्ये दाखल होणार आहे, एक म्हणजे Maruti Vitara SUV व दुसरी म्हणजे Citroen C3 प्रीमियम मिड साईझ SUV सगळ्यात जास्त Citroen C3 ‘या’ Car बाबत कार प्रेमींना उत्सुकता लागली आहे. या कारबद्दल आपण अधिक डिटेल्स जाणून घेउया…

फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen C3 20 जुलै 2022 रोजी भारतीय बाजारपेठेत आपली दुसरी कार लॉन्च करणार आहे.अधिकृत लाँच होण्याआधी, आता 21,000 रुपयांच्या टोकन रकमेसाठी प्री-बुकिंग सुरू झाली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा त्यांच्या जवळच्या डीलरशिपला भेट देऊन नवीन Citroen C3 बुक करू शकता…

Citroen C3 ही सबकॉम्पॅक्ट SUV आहे. मात्र, कंपनीने याला ‘हॅचबॅक विथ अ ट्विस्ट’ म्हटले आहे. ही कार भारतात दोन इंजिन पर्यायांसह लॉन्च करण्यात येणार आहे. पहिली 1.2-लिटर नॅचरली-एस्पिरेटेड पेट्रोल मोटर जे 81 bhp आणि 115 Nm टॉर्क जनरेट करेल. तर दुसरे 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल, जे 109 Bhp आणि 190 Nm जनरेट करेल…

मिळणार दोन इंजिन ऑप्शन :-

ट्रान्समिशनसाठी ही Car 5-स्पीड MT आणि 6-स्पीड MTगिअरबॉक्सशी जोडले जाईल. फीचर्स बद्दल बोलायचं झाल्यास, यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेसह 10.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 4-स्पीकर साउंड सिस्टम, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि बरंच काही….

कार मायलेज मिळणार दमदार…

Fuel efficiency च्या बाबतीत, Citroen C3 चे 1.2-लीटर नॅचुरली-अ‍ॅस्पिरेट केलेले पेट्रोल इंजिन 19.8 Km / L, तर त्याची टर्बो पेट्रोल मोटर 19.4 Km / L रिटर्न देत असल्याचा दावा केला जात आहे. रेनॉल्ट किगर 20.5 kmpl आणि Nissan Magnite 20 kmpl नंतर Citroen C3 ही भारतातील तिसरी सर्वात इंधन कार्यक्षम सबकॉम्पॅक्ट SUV असणार आहे.

सेफ्टी फीचर्सने सुसज्ज :- 

नवीन Citroen C3 मध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, सीट बेल्ट रिमाइंडर, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, EBD सह ABS इ. सेफ्टी फीचर्स मिळतील. त्याची एक्स-शोरूम किंमत 6 लाख ते 10 लाख रुपये असण्याची अपेक्षा आहे. लॉन्च झाल्यानंतर, टाटा पंच, निसान मॅग्नाइट, रेनॉल्ट किगर आणि किया सोनेटशी थेट स्पर्धा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *