‘या’ Sedan कारच्या आसपासही कोणी नाही, महिनाभरात तब्बल 13,747 युनिट्सची विक्री ; किंमतही स्वस्त, पहा डिटेल्स !

0

शेतीशिवार टीम : 29 ऑगस्ट 2022 : आज आपण जुलै महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या सेडान कार बद्दल जाणून घेणार आहोत. यामध्ये मारुती डिझायर (Maruti Dzire) 13,747 वाहनांच्या विक्रीसह या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, जुलै 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 10,470 वाहनांच्या तुलनेत 3,277 अधिक वाहनांच्या विक्रीसह तिने 31.30% वाढ नोंदवली आहे.

Maruti Dzire च्या जून 2022 मध्ये या वाहनाची 12,597 वाहने विकली गेली होती. डिझायर ही सध्या 38.09% मार्केट शेअरसह भारतात सर्वाधिक विकली जाणारी सेडान कार आहे. डिझायरची किंमत रु. 6.24 लाख (Ex-showroom) पासून सुरू होते.

या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या डिझायरशी स्पर्धा करणाऱ्या टाटाच्या टिगोरने (Tata Tigor) सध्या विभागातील 15% बाजारपेठ व्यापली आहे. जुलै 2022 मध्ये 5,433 वाहनांची विक्री झाली, जी जुलै 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 1,636 वाहनांच्या तुलनेत वर्ष-दर-वर्षाच्या तुलनेत 232.09 टक्क्यांनी आणि जून 2022 मध्ये 4,983 वाहनांच्या तुलनेत 10.18 टक्क्यांनी वाढली आहे.

ऑरा (Aura) आणि सिटी (City) या लिस्टमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत आणि वर्ष-दर-वर्षाच्या आधारावर दोन्ही विक्रीत घट झाली आहे. Aura चा सध्या मार्केट शेअर 11.13% आणि City 8.73% आहे.

जुलै महिन्यात Aura ची 4018 तर होंडा सिटीची 3149 वाहने विकली गेली. या यादीत होंडाची अमेझ (Honda Amaze) पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात 2767 वाहनांची विक्री झाली आहे.

मारुती डिझायर (Maruti Dzire) बद्दल फीचर्स आणि किंमत जाणून घेउया…

मारुती सुझुकीने भारतात सर्वात जास्त विकल्या जाणार्‍या सेडान कार DZire चे CNG व्हेरियंटही लॉन्च केलं आहे, जी या सेगमेंटमधील बेस्ट मायलेज कार आहे. ज्याचे Dzire VXi CNG आणि Dzire ZXi CNG असे 2 व्हेरियंट आहेत. मारुती डिझायर CNG चे मायलेज 31.12km/kg पर्यंत आहे आणि सेडान सेगमेंटमधील बेस्ट मायलेज देणारी CNG कार ठरली आहे.

कीमत आणि खासियत :-

मारुती डिझायर सीएनजीच्या (Dzire CNG) किमतीबद्दल बोलायचं झालं तर मारुती डिझायर VXi CNG ची किंमत 8.14 लाख रुपये (Ex-showroom) आहे आणि मारुती डिझायर ZXi CNG ची किंमत 8.82 लाख रुपये (Ex-showroom) आहे. कंपनीने नवीन 2022 मारुती डिझायर CNG तसेच त्याचे पेट्रोल व्हेरियंट मासिक सबस्क्रिप्शनच्या आधारावर रु. 16,999 आणि रु. 14,100 प्रति महिना ऑफर करण्यास सुरुवात केली आहे.

मायलेज सोबत परफॉर्मन्सही जबरदस्त :-

मारुती डिझायर सीएनजीच्या (Dzire CNG) इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, ते फॅक्टरी फिटेड सीएनजी (CNG) किट तसेच 1.2 लीटर के -सीरीज ड्युअलजेट इंजिनद्वारे समर्थित आहे, जे 71bhp पॉवर आणि 98.5Nm टॉर्क जनरेट करते.

Leave A Reply

Your email address will not be published.