शेतीशिवार टीम, 15 जानेवारी 2022 : काळात घरात अडकलेल्या लोकांसाठी दोन वर्षांपूर्वी वर्क फ्रॉम होम डेटा प्लान (Work From Home) सुरू करण्यात आला होता. मात्र दोन वर्षांनंतरही अजून कोरोनाचं सावट सगळीकडं पसरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वर्क फ्रॉम प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणूनच अधिक डेटा असलेल्या स्कीमना अजूनही मागणी आहे.
जर तुम्ही घरून काम करत असाल आणि कमी खर्चात अधिक डेटा आणि दीर्घ वैधता असलेली योजना शोधत असाल, तर तुमचा शोध येथे संपू शकतो. कारण आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या (BSNL) सर्वात लोकप्रिय आणि स्वस्त वर्क फ्रॉम होम प्लॅनबद्दल सांगणार आहोत.
बीएसएनएलच्या 599 रुपयांच्या प्लॅनचे फायदे :-
BSNL चे स्पेशल टेरिफ व्हाउचर (STV) प्लॅन BSNL व्हॉईस कॉलिंग ऑफर करते. या प्लॅनमध्ये दररोज 5GB डेटा मिळतो. 5GB डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 80 Kbps पर्यंत कमी केला जातो. ही योजना कोणत्याही नेटवर्कवर दररोज 100 मोफत एसएमएस (SMS) ऑफर करते. या प्लॅन ची वैधता 84 दिवसांची आहे.
बीएसएनएलच्या 251 रुपयांच्या प्लॅनची खासियत :-
BSNL 251 रुपये किमतीचा वर्क-फ्रॉम-होम प्रीपेड प्लॅन देखील ऑफर करते. या प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी 70GB डेटा उपलब्ध आहे. हा प्लॅन डेटा-विशिष्ट आहे आणि वापरकर्त्यांना या प्लॅनसह कॉलिंग किंवा एसएमएसचा (SMS) लाभ घेण्यासाठी वेगळे रिचार्ज करावे लागेल. त्याच वेळी, 151 रुपये किंमतीचा वर्क-फ्रॉम-होम प्रीपेड प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसाठी 40GB ऑफर करतो. हे सर्व रिचार्ज संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी लागू आहेत.