शेतीशिवार टीम, 15 जानेवारी 2022 : तुम्ही देखील इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत आहात परंतु महागडे मॉडेल्स खरेदी करू इच्छित नाही ? आम्ही तुमच्यासाठी देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरची लिस्ट घेऊन आलो आहोत. त्यांची किंमत सुमारे 30 ते 40 हजार रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 60 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळेल. येथे आम्ही ऑटो वेबसाइट bikedekho नुसार सर्व किंमती सांगत आहोत, ज्या वेगवेगळ्या राज्यावर भिन्न असू शकतात.

हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा (Hero Electric Optima) :-

Hero Electric Optima ची किंमत 55,580 रुपये आहे. Hero Optima HX इलेक्ट्रिक स्कूटर 1200W इलेक्ट्रिक मोटर आणि 51.2V/30Ah पोर्टेबल बॅटरीसह येते. कंपनीचा दावा आहे की, पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर 82 किमी पर्यंतची रेंज देते. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात. स्कूटरचा टॉप स्पीड 42kmph आहे.

अँपिअर V48 (Ampere) V48 :-

या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 37,390 रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 48 V, 20 Ah बॅटरी आहे, जी पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 50 किलोमीटर चालते. स्कूटरचा टॉप स्पीड 25 किमी प्रतितास आहे. स्कूटर पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 8 ते 10 तास लागतात.

Ujaas eGO :-

Ujaas eGO इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 34,880 रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 250W मोटर आणि 48V-26Ah बॅटरी आहे. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 6-7 तास लागतात. कंपनीचा दावा आहे की, फुल चार्ज केल्यावर त्याची ड्रायव्हिंग रेंज 60 किमी आहे. यात डिजिटल स्पीडोमीटर, अँटी थेफ्ट अलार्म, टेलिस्कोपिक सस्पेंशन (समोर), हायड्रोलिक सस्पेन्शन (मागील) आणि अलॉय व्हील यांसारखे फीचर्स आहेत.

एव्हॉन ई लाइट (Avon E Lite) :-

सायकलसाठी प्रसिद्ध असलेली एव्हॉन ही कंपनीही या इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करते. याची किंमत 28,000 रुपये (एक्स-शोरूम) आहे. या हलक्या वजनाच्या स्कूटरमध्ये 48V 12AH बॅटरी आहे, जी पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 50-60 किलोमीटर चालते. स्कूटरचा टॉप स्पीड 24 किमी प्रतितास आहे. स्कूटर पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 6 ते 8 तास लागतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *