Take a fresh look at your lifestyle.

मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय हा 147 रु. शेयर ; फक्त 8 महिन्यांत 1 लाखांचे झाले 50 लाख ; तुमच्याकडं आहे का ?

0

शेतीशिवार टीम, 25 डिसेंबर 2021 : आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याने या वर्षी 2021 मध्ये 5,192% रिटर्न्स देऊन आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे.

या पेनी स्टॉकने (Penny stock) एप्रिल 2021 पासून आजपर्यंत मजबूत रिटर्न्स देऊन गुंतवणूकदारांना आश्चर्यचकित केलं आहे. हा शेयर्स EKI एनर्जी सर्व्हिसचा (EKI Energy Services) आहे. 2011 पासून ही देशातील कार्बन क्रेडिट इंडस्ट्री मधील एक आघाडीची कंपनी आहे.

एप्रिल 2021 मध्ये झाली कंपनीची लिस्टिंग :- 

EKI एनर्जी सर्व्हिस या वर्षी एप्रिलमध्ये शेअर बाजारात लिस्ट झाली होती. त्यावेळी कंपनीचा शेअर फक्त 147 रुपयांवर लिस्ट झाला होता. एप्रिलपासून स्टॉक 5,000% हून अधिक वाढला आहे. आणि डिमांड इतकी जास्त आहे की, जवळजवळ दररोज 5% अपर सर्किट मिळत आहे. जर एखाद्याने या शेअरमध्ये 8 महिन्यांपूर्वी फक्त 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याचं मूल्य 50 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते…

काय आहे कंपनीचा व्यवसाय :-

कंपनी हवामान बदल सल्लागार (Climate change advisory), कार्बन क्रेडिट ट्रेडिंग, बिझिनेस अँक्सीलेंस अँडव्हायजरी आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिटमध्ये सेवा प्रदान करते. परंतु कंपनीचा मुख्य व्यवसाय कार्बन क्रेडिटचा व्यापार करणे आहे. भारताचा कार्बन बाजार हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे आणि त्याने लाखो कार्बन क्रेडिट्स निर्माण केले आहेत.

जेव्हा EKI एनर्जी सर्व्हिसचा शेअर त्याच वर्षी म्हणजेच एप्रिल 2021 मध्ये लिस्ट झाला होता, तेव्हा या स्टॉकची मार्केट कॅप फक्त 18 कोटी रुपये होती. हेच मार्केट कॅप आता 5093 कोटी रुपये झाले आहे.

ही कंपनी मार्च 2021 पर्यंत पूर्णपणे कर्जमुक्त कंपनी आहे. कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी 73.5% आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.