शेतीशिवार टीम, 25 डिसेंबर 2021 : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने केंद्र सरकारने एक योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना वृद्धापकाळात 5000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळते. आज म्हणजेच 25 डिसेंबरला अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त या योजनेबद्दल जाणून घेऊयात.
काय आहे ही योजना :
या योजनेचे नाव अटल पेन्शन योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याचं वय 18 ते 42 वर्षे आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही मासिक आधारावर 1 ते 5 हजार रुपये पेन्शन घेऊ शकता. तुम्ही पेन्शनसाठी 42 रुपयांपासून सुरुवात करू शकता. 18 व्या वर्षी या माफक रकमेपासून सुरुवात करून, वृद्धापकाळात 1000 रुपये पेन्शनची व्यवस्था करता येईल.
उदाहरणाने समजून घेऊ ; समजा तुमचं वय 18 वर्षे आहे आणि तुम्हाला 60 वर्षांनंतर दरमहा 5000 रुपये पेन्शन हवे असेल, तर तुम्हाला दरमहा 210 रुपये भरावे लागतील. गुंतवणुकीची रक्कम वयानुसार वाढत जाईल. याशिवाय 80C अंतर्गत करात सूट ही मिळू शकते.
खासियत :-
गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर, पती/पत्नीला आजीवन पेन्शनची रक्कम हमी दिली जाते आणि शेवटी, गुंतवणूकदार आणि जोडीदार दोघांचा मृत्यू झाल्यास, संपूर्ण पेन्शनची रक्कम नॉमिनीला दिली जाते.