Take a fresh look at your lifestyle.

क्रूझ कंट्रोलवाली Hero ची इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच ; किंमत फक्त 56,000 ; 80Km पेक्षा जास्त रेंज…

0

शेतीशिवार टीम, 25 डिसेंबर 2021 : देशातील लोकप्रिय इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी Hero Electric ने आपल्या Optima HX इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये क्रूझ कंट्रोल फीचर लॉंच केलं आहे. 

या फीचरद्वारे आता रायडरला हिरोची इलेक्ट्रिक स्कूटर चालवणे अधिक सोयीस्कर होणार आहे.क्रूझ कंट्रोल हे फीचर अँक्टिव्ह केल्यानंतर तुमची स्कूटर एका ठराविक वेगाने धावत राहणार आहे. हा वेग तुम्ही स्वतः ठरवू शकता…

एकदा अँक्टिव्ह झाल्यावर, अपग्रेड केलेल्या स्पीडोमीटरमध्ये नवीन क्रूझ कंट्रोल दिसेल. एकदा ब्रेक दाबल्यानंतर किंवा थ्रॉटल दाबल्यानंतर फीचर्स आपोआप डिअँक्टिव्हेट होईल. अशा प्रकारचं फीचर्स वाहनांमध्ये सर्रास दिसून येत होते. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हे फीचर्स मिळणं खूप रोचक आहे. Hero Electric Optima HX आता कंपनीच्या डीलरशिपवर रु. 55,580 (एक्स-शोरूम, सुधारित FAME II सबसिडी) किमतीत उपलब्ध आहे.

80KM पेक्षा जास्त रेंज :-

Hero Optima HX इलेक्ट्रिक स्कूटर 1200W इलेक्ट्रिक मोटर आणि 51.2V/30Ah पोर्टेबल बॅटरीसह उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की, पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर 82 किमी पर्यंतची रेंज देते. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात. स्कूटरचा टॉप स्पीड 42kmph आहे.

हे आहेत फीचर्स :-

इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ऍप्रॉन-माउंट केलेले टर्न इंडिकेटर, यूएसबी पोर्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, 12-इंच अलॉय व्हील, रिमोट लॉक, एलईडी हेडलाइट आणि अँटी थेफ्ट अलार्म सारखे फीचर्स आहेत. यात स्टेप-अप सीट आणि सिंगल-पीस पिलियन ग्रॅब रेल देखील मिळते.

Leave A Reply

Your email address will not be published.