शेतीशिवार टीम, 13 एप्रिल 2022 :- सरकारी नोकरीची (Government jobs) तयारी करणारे उमेदवार लेखी परीक्षेची तसेच इंटरव्हिव्ह ची (Interview) तयारी करतात.इंटरव्हिव्ह दरम्यान अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात. बँक एक्झॅम किंवा UPSC (upsc civil services interview) प्रत्येकासाठी ही परीक्षा पार करणं खूप कठीण असतं. त्यामुळे कँडिडेट्स ही जनरल नॉलेजवर भर देतात. कधी कधी इंटरव्हिव्हमध्ये भन्नाट प्रश्न विचारले जातात तर कधी नवीन माहिती देणारे प्रश्न असतात. आपण तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित काही जनरल नॉलेजचे प्रश्न सांगत आहोत जे इंटरव्हिव्ह दरम्यान विचारले जाऊ शकतात. चला जाणून घेऊया काही मनोरंजक प्रश्नांची उत्तरे….
प्रश्न : असा कोणता देश आहे, तिथे विंचू तळून खातात ?
उत्तर : चीन हा असा देश आहे जिथे विंचू तळून खातात. चीनमध्ये असे अनेक प्रकारचे जीव खाल्ले जातात…
प्रश्न : असा कोणता वायू आहे, ज्यामुळे फुलांचा रंग फिका पडतो ?
उत्तर : क्लोरीन वायूमुळे फुलांचा रंग खराब होतो. या वायूमुळे फुले कोमेजलेली दिसतात.
प्रश्न : जगातील सर्वात मजबूत हाडे असलेला प्राणी कोणता ?
उत्तर : वाघाचे हाड हे जगातील सर्वात मजबूत हाड आहे.
प्रश्न : मानवी शरीराचा कोणता भाग वीज निर्माण करतो ?
उत्तर : मानवी मेंदू हा एक अवयव आहे ज्यापासून वीज निर्माण होते. विज्ञानानुसार मानवी मेंदू 10 ते 12 वॅट वीज निर्माण करू शकतो.
प्रश्न : रात्रीच्या वेळी ट्रेन जास्त वेगाने का धावते ?
उत्तर : ट्रेन रात्रीच्या वेगाने धावते कारण, रात्री ट्रॅकमध्ये मेंटेनन्सचे काम होत नाही. तसेच प्राणी किंवा मानव रात्रीच्या वेळी ट्रॅक ओलांडत नाहीत…
प्रश्न : भारतातील सर्वात पहिलं विमानतळ कोणतं आहे ?
उत्तर : भारतातील पहिले विमानतळ अलाहाबाद येथे बांधण्यात आले. जे 1919 मध्ये बांधले गेले. हे देशातील पहिले विमानतळ आहे.
प्रश्न : असा कोणता देश आहे, जिथे तुरुंगातून पळून जाणे गुन्हा मानला जात नाही ?
उत्तर : जर्मनी हा असा देश आहे जिथे तुरुंगातून पळून जाणे गुन्हा मानला जात नाही. जर्मन कायद्यानुसार स्वातंत्र्य हा मानवी हक्क आहे. ..
प्रश्न : असा कोणता देश आहे, जिथे स्त्री पतीला दुसऱ्या लग्नासाठी रोखू शकत नाही ?
उत्तर : इरिट्रिया हा असा देश आहे, जिथे प्रत्येक पुरुषाला दोन लग्न करणे अनिवार्य आहे. येथे कोणतीही स्त्री आपल्या पतीला दुसरं लग्न करण्यापासून रोखू शकत नाही. असे केल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे.
प्रश्न : समजा तुमच्याकडे 2 गायी आणि 4 शेळ्या आहेत तर तुम्हाला एकूण किती पाय आहेत ?
उत्तर : या प्रश्नाच्या उत्तरात कँडिडेट्स म्हणाले – मला फक्त दोन पाय आहेत…
प्रश्न : असा कोणता जीव आहे, जो आठवडाभर आपला श्वास रोखून धरू शकतो ?
उत्तर : विंचू हा एक असा जीव आहे जो आठवडाभर आपला श्वास रोखून धरू शकतो.
प्रश्न : असा कोणता जीव आहे, जो वेगाने उडू तर शकतो, पण पायाने चालू शकत नाही ?
उत्तर : ‘वटवाघुळ’ हा असा जीव आहे, जो वेगाने तर खूप उडू शकतो, पण पायाने चालू शकत नाही…
प्रश्न : भारतातील पहिले रेल्वे स्टेशन कोणतं आहे ?
उत्तर : भारतातील पहिले रेल्वे स्टेशन ‘बोरी बंदर’ आहे, जे आज ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ म्हणून ओळखलं जातं. भारतातील पहिली ट्रेन 16 एप्रिल 1853 रोजी बोरी बंदरहून ठाणे या भारतातील पहिले रेल्वे स्टेशनकडे रवाना झाली होती…
प्रश्न : भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणतं आहे ?
उत्तर : भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल मुंबई येथे असलेले ताज हॉटेल आहे. ते 1930 मध्ये पूर्ण झाले.
प्रश्न : जगातील सर्वात विषारी विष कोणते ?
उत्तर : पोलोनियम 210 (Polonium-210) हे सर्वात विषारी विष आहे. हा एक ‘रेडियोएक्टिव तत्व आहे. पोलोनियम-210 फक्त एक ग्रॅम विष हे हजारो लोकांचा जीव घेऊ शकतो.