शेतीशिवार टीम, 28 एप्रिल 2022 :- देशात दरवर्षी लाखो विद्यार्थी सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करतात. यातील काही विद्यार्थ्यांना यश मिळते तर काहींना विविध कारणांमुळे अपयश मिळतं. यश मिळविण्यासाठी, विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाची तसेच परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची तयारी करणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्यांच्या अभ्यासक्रमाची तसेच चालू घडामोडींची (current affairs) चांगली माहिती असावी. कारण नोकरीच्या भरतीमध्ये जिथे निवड मुलाखतीच्या आधारे होते, तिथे काही वेळा अभ्यासक्रमाबाहेरचे ही प्रश्न विचारले जातात.अशा परिस्थितीत आपण तुमच्या माहितीसाठी सामान्य ज्ञानाशी (general knowledge) संबंधित काही प्रश्न जाणून घेणार आहोत ते तुमच्या तयारीसाठी फायदेशीर ठरू शकतात….
प्रश्न – असं कोणतं शहर आहे, तिथे संपूर्ण जगाची लोकसंख्या समावू शकते ?
उत्तर – लॅन्स एंजेलिस (Lance Angelis) हे एक असं शहर आहे ज्यामध्ये संपूर्ण जगाची लोकसंख्या समावू शकते…
प्रश्न- जगातील सर्वात हुशार प्राणी कोण आहे ?
उत्तर- चिंपांझी (Chimpanzee) हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. तो माणसासारखा विचार करू शकतो,असं म्हटलं जातं.
प्रश्न – असा कोणता देश आहे तिथे फक्त 825 लोक राहतात?
उत्तर- 2019 च्या जनगणनेनुसार व्हॅटिकन सिटी (Vatican City) मध्ये फक्त 825 लोक राहतात. याला जगातील सर्वात लहान राज्य असेही म्हटले जाते…
प्रश्न – पहाडांची मल्लिका कोणाला म्हटलं जातं ?
उत्तर – पहाडांची मल्लिका नेतरहाटला (Netarhat) म्हटलं जातं , हे ठिकाण झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात आहे.
प्रश्न – जगातील सर्वात उष्ण ठिकाण कोणतं आहे ?
उत्तर – अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये (California) डेथ नावाचे ठिकाण आहे, ते जगातील सर्वात उष्ण ठिकाण मानलं जातं.
प्रश्न – सर्वात उंच उडणारा पक्षी कोणता आहे ?
उत्तर – सर्वात उंच उडणाऱ्या पक्ष्याचे नाव गिधाड आहे.
प्रश्न – आशियातील सर्वात उष्ण शहर कोणते आहे ?
उत्तर – पाकिस्तानचे जेकोबाबाद (Jacobabad) हे असं शहर आहे, जे आशियातील सर्वात उष्ण ठिकाण असल्याचे म्हटलं जातं…
प्रश्न – माणूस न झोपता किती दिवस जगू शकतो ?
उत्तर – माणूस न झोपता फक्त 11 दिवस जगू शकतो. यापेक्षा जास्त दिवस जगणं शक्य नाही…
प्रश्न – जगातील पाहिलं पुस्तक प्रकाशित करणाऱ्या व्यक्तीचे नाव काय ?
उत्तर – जगातील पहिले पुस्तक छापणाऱ्या व्यक्तीचे नाव कोस्टर आहे.
प्रश्न – जगातील सर्वात स्वस्त वीज कोणत्या देशात मिळते ?
उत्तर – कतार (Qatar)
प्रश्न – भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो पहिल्यांदा कधी आला ?
उत्तर – 1969 मध्ये महात्मा गांधींचा फोटो भारतीय नोटांवर आला होता.
प्रश्न – क्रिकेट इज माय स्टाइल कोणत्या क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे ?
उत्तर – क्रिकेट इज माय स्टाइल हे भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव यांचे आत्मचरित्र आहे.
प्रश्न – हत्ती आपल्या सोंडेत किती लिटर पाणी धरू शकतो ?
उत्तर – हत्ती आपल्या सोंडेत 5 लिटर पाणी धरू शकतो.
प्रश्न – भारतात आलेलं पाहिलं ब्रिटिश जहाज कोणतं होतं ?
उत्तर – भारतात आलेले पहिले ब्रिटिश जहाज हे रेड ड्रॅगन (Red Dragon) होतं. 1608 मध्ये कॅप्टन हॉकिन्सच्या नेतृत्वाखाली हे ब्रिटिश जहाज सुरत बंदरात आलं. सागरी मार्गाने भारतीय भूमीवर पाऊल ठेवणारा हॉकिन्स हा पहिला इंग्रज होता…
प्रश्न – आशियातील सर्वात उष्ण शहर कोणते आहे ?
उत्तर – पाकिस्तानचे जेकोबाबाद (Jacobabad) हे असं शहर आहे, जे आशियातील सर्वात उष्ण ठिकाण असल्याचे म्हटलं जातं…
प्रश्न – असा कोणता देश आहे, तिथे फक्त 825 लोक राहतात ?
उत्तर – 2019 च्या जनगणनेनुसार व्हॅटिकन सिटी (Vatican City) मध्ये फक्त 825 लोक राहतात. याला जगातील सर्वात लहान राज्य असेही म्हटले जाते…
प्रश्न – जगातील सर्वात महागडी वस्तू कोणती आहे ?
उत्तर – जगातील सर्वात महागडी वस्तू अँटीमॅटर (antimatter) म्हणजे प्रतिपदार्थ आहे. काही वर्षांपूर्वी, NASA ने त्याच्या एका ग्रॅमची किंमत $62.5 ट्रिलियन डॉलर्स मानली होती, जी आता $90 ट्रिलियन डॉलर्स झाली आहे. अँटिमेटर (antimatter) हा एक प्रकारचा पदार्थ आहे जो पॉझिट्रॉन, अँटी-प्रोटॉन, अँटी-न्यूट्रॉन यांसारख्या प्रतिकणांनी बनलेला असतो. ते प्रति क्वार्क प्रति प्रोटॉन आणि विरोधी न्यूट्रॉनपासून बनलेले आहेत…
प्रश्न – लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव कोणी व किती मतांनी केला होता ?
उत्तर – 1977 च्या लोकसभा निवडणुकीत, त्यांना एका साध्या समाजवादी नेते राजनारायण यांनी आव्हान दिलं होतं. यामुळे इंदिराजीसह अनेक काँग्रेस दिग्गजांचा पराभव झाला होता. ते नेते होते राज- नारायण.यांनी 1977 च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा 52 हजार मतांनी पराभव केला.