शेतीशिवार टीम, 28 एप्रिल 2022 :- भारतातील कमी बजेट 7 सीटर MPV सेगमेंटने अलीकडच्या काही वर्षांत अनेक नवीन कार्स लाँच केल्या आहेत, यामध्ये मार्केटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी काही वाहने ग्राहकांच्या पसंतीत पडले आहेत.
थ्री-रो MPV ची लोकप्रियता अधिक वाढत असल्याने या सेगमेंटमध्ये आता ग्राहकांच्या बजेटमध्ये अनेक ऑप्शन उपलब्ध झाले आहे. पण आज आपण देशातील सर्वात स्वस्त MPV बद्दल जाणून घेणार आहोत…
ती सर्वात स्वस्त MPV म्हणजे Renault Triber आहे, ही भारतातील सर्वात स्वस्त MPV आहे. त्याची मागणी इतकी जबरदस्त आहे की, 2019 मध्ये लॉन्च झाल्यापासून, Renault India ने आतापर्यंत 1 लाखाहून अधिक युनिट्स विकल्या आहेत. 4-स्टार रेटिंगसह ग्लोबल NCAP क्रॅश चाचण्यांमध्ये ही सर्वात सुरक्षित कार आहे…
इंजिन :-
रेनॉल्ट ट्रायबरमध्ये (Renault Triber) 1.0-लिटर नॅचरली – एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. हे पेट्रोल इंजिन कमाल 71 एचपी (HP) पॉवर आणि 96 न्यूटन मीटर पीक टॉर्क जनरेट करतं. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि AMT शी जोडलेलं आहे.
फीचर्स :-
या वाहनात तुम्हाला 20.32 Cm टचस्क्रीन MediaNAV इव्होल्यूशन, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ आणि फोन कंट्रोल्स, एलईडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्मार्ट ऍक्सेस कार्ड, पुश स्टार्ट-स्टॉप बटण, एलईडी डीआरएलसह प्रोजेक्टर हेडलॅम्प यांसारखे फीचर्स मिळत आहे.
व्हेरियंट :-
Renault Triber 10 व्हेरियंटमध्ये RXE, RXL, RXT, limited Edition, RXT Easy-R, RXZ, RXZ Dualtone, Limited Edition Easy-R, RXZ Easy-R, RXZ Easy-R Duletone सह येतात…
किंमत :-
Renault Triber ची RXE प्रकाराची Ex-showroom किंमत Rs 5,76,000 लाखांपासून सुरू होते आणि RXZ Easy-R Duletone च्या टॉप व्हेरियंटची किंमत 8,32,000 लाख एक्स-शोरूम पर्यंत जाते…