शेतीशिवार टीम, 27 मे 2022 :- गव्हर्नमेंट जॉब असो किंवा प्रायव्हेट जॉब ! नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांना विविध प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना इंटरव्हिव्हसाठी बोलावलं जातं. मुलाखतीत त्याच्या संबंधित प्रश्नांसोबतच त्यांच्या पूर्वीच्या अनुभवांचीही चर्चा केली जाते. पण सामान्य ज्ञान आवश्यक असल्याने उमेदवारांकडून सामान्य ज्ञानाशी संबंधित विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात.
अशा परिस्थितीत, उमेदवारांनी त्यांच्या अभ्यासक्रमाविषयी तसेच सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्नांची मुलाखतीची तयारी करणे आवश्यक आहे. सामान्य ज्ञानाचे ( (current affairs) क्षेत्र मोठे असले तरी परीक्षेशी संबंधित काही प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे. आपण इंटरव्हिव्हसाठी विचारलेल्या अशाच काही प्रश्नांबद्दल जाणून घेणार आहोत. जे तुमच्या तयारीसाठी खूप महत्वाचं आहे. जाणून घेऊया असेच काही सामान्य ज्ञानाचे प्रश्न…
प्रश्न : हत्ती त्यांच्या सोंडेने किती वजन उचलू शकतो ?
उत्तर : हत्तीचे सरासरी वजन 5 हजार किलो असतं, तो आपल्या सोंडेने 300 किलो वजन उचलू शकतो.
प्रश्न : एक ग्लास पाणी प्यायल्यानंतर शरीरात काय होतं ?
उत्तर : एक ग्लास पाणी प्यायल्याने मेंदू 14% वेगाने काम करू लागतो, यासोबतच माणसाची तहानही भागते…
प्रश्न : भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता आहे ?
उत्तर : पीर पंजाल बोगदा हा भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे. त्याची लांबी सुमारे 11.2 कि.मी आहे.
प्रश्न : सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर येण्यासाठी किती सेकंद लागतात ?
उत्तर : सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर येण्यास 499 सेकंद लागतात.
प्रश्न : भारतातील असं कोणतं राष्ट्रीय उद्यान तरंगत आहे ?
उत्तर : भारतातील मणिपूरमधील किबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान हे देशातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान आहे.
प्रश्न : रक्ताचा सर्वात मोठा भाग कोणता आहे ?
उत्तर : रक्ताचा सर्वात मोठा भाग हा प्लाझ्मा (Blood plasma) आहे.
प्रश्न : जगातील सर्वात महाग रक्त कोणाचं आहे ?
उत्तर : जगातील सर्वात महाग रक्त हे खेकड्याचं आहे, त्याला हॉर्सशू क्रैब (Horseshoe crab) असंही म्हणतात. या खेकड्याचं रक्त निळ्या रंगाचं असून याला आंतराष्ट्रीय बाजारात खूप मागणी आहे. आंतराष्ट्रीय बाजारात या निळ्या रंगाच्या रक्ताची किंमत 11 लाख रुपये इतकी आहे. याचा उपयोग अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी केला जातो.
प्रश्न : नवी दिल्लीपूर्वी भारताची राजधानी कोठे होती ?
उत्तर : नवी दिल्लीपूर्वी 1911 मध्ये भारताची राजधानी कोलकत्ता होती. ती रॉयल कॅपिटल ब्रिटीश भारताची राजधानी म्हणून दिल्लीचा पाया महाराजा जॉर्ज पंचम यांनी 1911 च्या राज्याभिषेक दरबारात घातला अन् त्यानंतर दिल्लीला भारताची राजधानी म्हणून ओळखलं जातं.
प्रश्न : जगातील असा कोणता महासागर आहे, ज्यामध्ये कोणीही बुडू शकत नाही ?
उत्तर : जगातील एकमेव महासागर ज्यामध्ये कोणीही बुडू शकत नाही तो म्हणजे मृत सागर.
समुद्रसपाटीपासून 440 मीटर खाली मृत महासागर हा जगातील सर्वात शेवटचा बिंदू असल्याचं म्हटलं जातं. याला सर्वात कमी खाऱ्या पाण्याचे सरोवर असेही म्हणतात. 65 कि.मी लांब आणि 18 कि.मी रुंद महासागर त्याच्या उच्च घनतेसाठी ओळखला जातो, ज्यामुळे कोणीही व्यक्ती बुडणे अशक्य होतं.