शेतीशिवार टीम,10 डिसेंबर 2021:- मध आणि मनुका यांच्यात मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियमसारखी पोषकतत्वे असतात. मनुका आणि मध या दोन्ही अशा गोष्टी आहेत, ज्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.पण हे दोन्ही एकत्र सेवन केल्यास ते अधिक फायदेशीर ठरततात.रोज मध आणि मनुका खाल्ल्याने अनेक शारीरिक समस्या दूर होतात.मनुका आणि मध खाल्ल्याने पुरुषांमधील सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन वाढतो.याशिवाय आरोग्याशी संबंधित इतर अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते.विवाहित पुरुषांना मनुका आणि मध एकत्र खाल्ल्याने अनेक फायदे होतात.
चला तर मग जाणून घेऊया सविस्तर:-
1.शुक्राणूंची संख्या वाढवण्यास मदत करते:-
पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असल्यास,मध आणि मनुक्याचे सेवन करावे हे खूप फायदेशीर आहे.कारण स्त्रीची प्रजनन संस्था सुधारण्यास मदत होते, याचे सेवन केल्याने विवाहित पुरुषांमधील कमजोरीची समस्या दूर होते.
2.शारीरिक कमजोरी दूर होते:-
मनुका आणि मध एकत्र सेवन केल्याने तुमची शारीरिक कमजोरी दूर होण्यास खूप मदत होते.पुरुषांनी याचे नियमित सेवन केल्यास त्यांच्या शारीरिक दुर्बलतेवर मात करण्यास नक्कीच मदत होते.आयुर्वेदानुसार,मनुक्यासोबत मध मिसळून खाल्ल्याने वैवाहिक जीवनात राहणाऱ्या पुरुषांना खूप फायदा होतो. मनुका आणि मध टेस्टोस्टेरॉन बूस्टिंग फूड्स मध्ये येतात, ज्यामुळे पुरुश्यांची देखील प्रजनन संस्था मजबूत होण्याची शक्यता वाढते.
3.प्रोस्टेट कॅन्सर धोका कमी असतो:-
पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सर चा सर्वाधिक धोका जास्त असतो. तसेच ही स्थिती टाळण्यासाठी तुमचा आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. मध आणि मनुका या दोन्हीमध्ये अँटी-कॅन्सर गुणधर्म आढळतात,जे आपल्या शरीराच्या कोणत्याही भागात कॅन्सरच्या पेशी वाढण्यापासून रोखण्याचे काम करतात.हे दोन्ही पदार्थ कॅन्सरचा धोका कमी करतात.त्याचबरोबर शरीरातील इतर आजारही वाढण्यापासून रोखतात.
मध आणि मनुका खाण्याचे इतर फायदे :-
1. जर तुम्हाला बद्धकोष्ठता,ऍसिडिटी आणि थकवा यासारख्या समस्यांनी पीडित असाल तर, तुम्ही रात्री मनुका रात्री भिजायला घाला सकाळी ते पाणी प्यावे जे खूप फायदेशीर ठरते.
2.मनुक्याचे पाणी नियमित प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि पचनाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते. मनुक्याचे पाणी पिणे खूप फायदेशीर आहे आणि त्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया देखील चांगली राहते.
3. मनुक्यांचं पाणी रक्त शुद्ध करण्यास देखील मदत करते आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास आणि तसेच एजिंग प्रोपर्टी राखण्यास देखील मदत करते.