शेतीशिवार टीम, 20 एप्रिल 2022 :- टू-व्हीलर्स मध्ये भव्य-दिव्य असं लक्झरीच नवीन चॅप्टरची सुरुवात करत, Honda Motorcycle and Scooter India (होंडा मोटरसाइकल अँड स्कूटर इंडिया) ने मंगळवारी भारतात 2022 गोल्ड विंग टूर (2022 गोल्ड विंग टूर) लाँच केली. नवीन मॉडेलची जपानमधून CBU (कम्प्लीटली बिल्ट-अप) मार्गाने भारतीय बाजारपेठेत विक्री केली जाणार आहे.

ड्यूल क्लच ट्रांसमिशनसह एअरबॅग्ज मिळतील :-

लाँचबद्दल भाष्य करताना, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर, प्रेजीडेंट आणि सीईओ तसेच आत्सुशी ओगाता म्हणाले,“गेल्या काही वर्षांमध्ये,गोल्ड विंगने होंडाच्या लेटेस्ट टेक्नोलॉजीसाठी एक मजबूत प्रतिष्ठा निर्माण केली आहे. एक नवीन आयाम देऊन,आम्ही एक नवीन अध्याय सुरू करत आहे. एअरबॅगसह 2022 गोल्ड विंग टूर डीसीटी मॉडेलसह भारतात टू-व्हीलर लक्झरीमध्ये करणार आहोत.

नवीन 2022 मॉडेल,होंडा मोटरसाइकल अँड स्कूटर इंडिया के डायरेक्टर-सेल्स एंड मार्केटिंग,यदविंदर सिंह गुलेरिया म्हणाले, “होंडा गोल्ड विंगने गेल्या दशकभरात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणले आहेत, ज्यामुळे लक्झरी, रेस्ट आणि सेफ्टीमध्ये नवीन आयाम मिळत आहेत. त्याच्या आकर्षक फीचर्सबद्दल गोल्ड विंग टूर विविध प्रकारच्या रस्त्यांवर राइडिंगचा सर्वोत्तम अनुभव प्रदान करते. आम्हाला हे जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे की ‘2022 गोल्ड विंग टूर (DCT)’ बुकिंग आता भारतात मोठ्या जोमात सुरू झाली आहे.”

इंजिन आणि परफॉर्मन्स :-

चेसिसच्या हैंडलिंग क्षमतेचा पुरेपूर वापर करताना इंजिन अतिरिक्त शक्ती प्रदान करते. गोल्ड विंग टूरचे 1833 cc लिक्विड-कूल्ड 4-स्ट्रोक 24-वाल्व्ह SOHC फ्लॅट-6 इंजिन 5,500rpm वर 93kW पीक पॉवर आणि 4,500rpm वर 170Nm पीक टॉर्क जेनरेट करते.

आख्यात मोटरसायकलचे कॅरेक्टर आणि पॉवर डिलिव्हरीमध्ये नवीन बदल आणून, थ्रॉटल बाय वायर (TBW) इंजिन मॅनेजमेंट 4 रायडर मोड (टूर, स्पोर्ट, इकॉन आणि रेन) मध्ये येत अजून सस्पेन्शन डॅम्पिंग आणि ड्युअल कंबाइंड ब्रेक सिस्टम (D-CBS) सोबत लिंक होत.

डीसीटी टेक्नोलॉजी :-

होंडाच्या ड्युअल क्लच ट्रान्समिशन (डीसीटी) टेक्नोलॉजी आणि प्रत्येक राइड मोडमध्ये अप/डाउनशिफ्टच्या आरपीएम रेंजसह गीअर्स बदलणे,वेग बदलणे सोपे होते. यामध्ये दोन क्लच वापरले जातात -एक स्टार्ट-अपसाठी,पहिला, तिसरा, पाचवा आणि सातवा आणि दुसरा, चौथा आणि सहावा – प्रत्येक क्लचसाठी एक मुख्य शाफ्ट आहे. यामध्ये सोपं क्रीप फारवर्ड आणि बॅक फंक्शनची फीचर्स देखील आहेत.

रेस्ट साठी पूर्ण सुविधा :-

रायडर आणि पिलियनसाठी स्वतंत्र सीट आणि पिलियनसाठी बॅक रेस्ट अँगल (16 ते 23 डिग्री) यामुळे मागे बसलेल्या व्यक्तीलाही आरामदायी वाटते, हालचाल करणे आणि ग्राउण्डवर पोहोचणे सोपे होते.सीट कव्हर्स लक्झरी न्यू स्यूड/ सिंथेटिक लैदरसह येतात ,पिलियन बॅकरेस्ट अँगल राईड रायडरला आराम देते.

फीचर्स :-

ड्यूल एलईडी फॉग लाईट्ससह फुल एलईडी लाइटिंग,दोन्ही बाजूंना ऑप्टिकल लेन्स वापरल्या जातात,ज्यामुळे ज्वेल-आय लो बीम लाइट सिग्नेचर तयार होते. तसेच ऑटो कॅन्सलिंग इंडिकेटर जिथे सिस्टीम पुढच्या आणि मागच्या चाकांच्या वेगातील फरक ओळखते आणि राइडिंग कंडिशननुसार इंडिकेशन कॅसिल करते.

आजच्या रायडर्सना सुविधा आणि कनेक्टिव्हिटीचा सर्वोत्कृष्ट अनुभव देण्यासाठी, 2022 गोल्ड विंग टूर एप्पल कार प्ले आणि एंड्रोइड ऑटो सोबत येते. हे रायडरला त्यांच्या स्मार्टफोनवर पर्सनलाइज माहिती आणि कंटेंट,जसे की टेलिफोन नंबर आणिम्युजिक प्लेलिस्टमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देते. याशिवाय, दोन यूएसबी टाईप-सी पोर्ट्सह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध आहे.

कलर, किंमत आणि उपलब्धता :-

होंडाने आपली एक्सक्लुसिव बिग विंग टॉपलाईन डीलरशिप्स-गुरूग्राम (हरियाणा), मुंबई (महाराष्ट्र), बैंगलुरू (कर्नाटक), इंदौर (मध्य प्रदेश), कोची (केरल), हैदराबाद (तेलंगाना) और चेन्नई (तमिलनाडु)मध्ये 2022 गोल्ड विंग टूर डीसीटीसह एअरबॅगचे बुकिंग सुरू झाले आहे.

एक्सक्लुसिव बिग विंग टॉपलाईन प्राईस

कलर :- गनमेटल ब्लॅक मेटॅलिक (ब्लॅक-आउट इंजिनसह))
किंमत :- (एक्स-शोरूम, गुरुग्राम, हरियाणा) रु. 39 लाख 20 हजार रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *