शेतीशिवार टीम,19 एप्रिल 2022 :- पेट्रोल – डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे कार निर्मात्यांनी भारतात इलेक्ट्रिक (EV) आणि सीएनजी (CNG) वाहने बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच कंपन्यांनी सध्याच्या पेट्रोल इंजिनमध्येही चांगले मायलेज देण्यासाठी काही बदल केले आहेत. आपण आज जाणून घेणार आहोत, सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या 5 पेट्रोल वाहनांची लिस्ट…

मारुती सेलेरियो (26.68 kmpl) :-

मारुती सुझुकीची सेकंड जनरेशनमधील सेलेरियो (Celerio) हॅचबॅक ही देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार आहे. कंपनीने तिला न्यू DualJet पेट्रोल इंजिनसह लॉन्च केलं आहे. Celerio AMT मॉडेल ARAI प्रमाणित मायलेज 26.68kmpl आणि मॅन्युअल मॉडेल 25.24kmpl देतं.

हे 1.0-लिटर ड्युअलजेट K10 पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे जे 67bhp आणि 89Nm टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशन ऑप्शनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT युनिट समाविष्ट आहे. त्याच्या LXI मॉडेलची किंमत 5,25,000 पासून सुरू होते आणि 7 लाख रुपयांपर्यंत जाते.

आपण CNG व्हेरियंट बद्दल जाणून घेउया….

मारुती सेलेरियो (Celerio) सीएनजी (CNG) 1 किलो गॅसमध्ये 35.60 किमी मायलेज देते. तर पेट्रोल व्हेरियंटमध्ये ते 26.68 किमी मायलेज देते. त्याची किंमत पेट्रोल व्हेरियंटपेक्षा थोडी जास्त आहे. Celerio CNG ची किंमत 6.58 लाख रुपये एक्स-शोरूमपासून सुरू होते.

होंडा सिटी (Honda City E: HEV (26.5 kmpl) :-

Honda ने आज नवीन City e : HEV हायब्रीड व्हेरियंट भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. हे नवीन मॉडेल 26.5kmpl चे प्रमाणित मायलेज देते. हे भारतातील दुसरे सर्वात जास्त इंधन कार्यक्षम वाहन बनलं आहे. कंपनीने आजपासून त्याचे प्रॉडक्शनही सुरू केलं आहे. आता यानंतर लवकरच ते बाजारात दाखल होणार आहे. नवीन सिटी E : HEV मध्ये 1.5L 4-सिलेंडर नॅचुरली एस्पिरेटेड ऍटकिन्सन सायकल पेट्रोल इंजिन आहे जे दोन इलेक्ट्रिक मोटर्सला जोडलेलं आहे. पेट्रोल मोटर 127Nm सह 98bhp पॉवर जनरेट करते, तर इलेक्ट्रिक मोटर 0 rpm वरून 253Nm सह 109bhp पॉवर वितरीत करते. सिटी हायब्रिडमध्ये 0.734kWh लिथियम-आयन बॅटरी आहे ज्याचे वजन 14.5kgs आहे. यात तीन ड्राइव्ह मोड आहेत – इंजिन ड्राइव्ह (केवळ पेट्रोल इंजिनवर चालते), EV ड्राइव्ह (केवळ इलेक्ट्रिक मोटरवर चालते) आणि हायब्रिड ड्राइव्ह (दोन्हींच्या संयोजनावर चालते)…

मारुती वॅगनआर (25.19 kmpl) :-

मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti WagonR) दोन पेट्रोल इंजिन ऑप्शनसह ऑफर केली जाते, एक 1.0L NA पेट्रोल आणि एक 1.2L NA पेट्रोल. यासोबतच हा टॉल-बॉय हॅचबॅक सीएनजी CNG ऑप्शनसह देखील येतो. ज्यामध्ये त्याचे मायलेज 34.05 kmplआहे. दुसरीकडे, AMT गिअरबॉक्ससह WagonR 1.0L चे ARAI प्रमाणित मायलेज 25.19kmpl आहे, तर मॅन्युअल व्हर्जनमध्ये त्याचे मायलेज 24.35 kmpl आहे. मारुती वॅगन आर ची किंमत रु. 5,47,500 पासून सुरू होते.

मारुती डिझायर (Maruti Dzire) (24.12kmpl) :-

मारुती सुझुकीने गेल्या वर्षी नवीन डिझायर सादर केली होती. यात 1.2L Dualjet K12N पेट्रोल इंजिन आहे. हे मॉडेल 90bhp आणि 113Nm टॉर्क निर्माण करते. हे मॅन्युअल आणि एएमटी (AMT) गिअरबॉक्स दोन्ही ऑप्शनसह येते. त्याचे AMT व्हेरियंट मॅन्युअलपेक्षा जास्त मायलेज देते. Dzire AMT चे मायलेज 24.12kmpl आहे. मॅन्युअलमध्ये 23.26kmpl आहे. मारुती डिझायरची किंमत 5.98 लाख ते 9.03 लाखांपर्यंत आहे.

मारुती स्विफ्ट Maruti Swift (23.76kmpl)  :-  

डिझायर प्रमाणे, नवीन स्विफ्टमध्ये 1.2-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन देखील आहे जे आयडल-स्टार्ट स्टॉप तंत्रज्ञानासह येते. त्याचे AMT मॉडेल 23.76kmpl आणि मॅन्युअल 23.2kmpl ARAI प्रमाणित मायलेज देते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *