शेतीशिवार टीम, 18 एप्रिल 2022 :- भारतात महागाईच्या काळातही वाहनाची प्रचंड मागणी वाढताना दिसून येत आहे. लोक वेगाने बुकिंग करत आहेत. अशे एक हॉरर SUV त्याचा लुक आणि जबरदस्त फीचर्सने ग्राहक दिवाने झाले आहे. खरं तर आपण जाणून घेत आहोत महिंद्र थारबद्दल (Mahindra Thar)…
एसयूव्ही (SUV) सेगमेंटमध्ये ऑफ-रोडिंगसह, पॉवरफुल लुक-फीचर्ससह महिंद्र थारचे (Mahindra Thar) लोक वेडे आहेत. महिंद्र थार ही सध्या सर्वात जास्त व्हेटिंग पिरियड असलेली SUV आहे ज्याचा व्हेटिंग पिरियड 11 महिन्यांपर्यंत आहे.
जर कोणी ही कार आता बुक केली असेल, तर त्याला ती 2023 पर्यंत मिळण्याची अपेक्षा आहे. SUV ची किंमत 13.17 लाख रुपयांपासून सुरू होऊन त्या 15.53 लाख रुपयांपर्यंत (Ex-showroom) जातात.
मायलेज :-
महिंद्र थार 6 कलर ऑप्शनमध्ये ऑफर केली असून, महिंद्रा थारचे मायलेज 15.2 kmpl पर्यंत आहे. महिंद्रा थार एसयूव्ही AX(O) आणि LX या दोन ट्रिम स्तरांवर एकूण 10 व्हेरियंटमध्ये ऑफर केली गेली आहे. सध्या महिंद्रा थारचा रेड आणि ब्लॅक कलर ऑप्शन ग्राहकांना जास्त आकर्षित करत आहे.
इंजिन :-
महिंद्रा थारला (Mahindra Thar) दोन इंजिन ऑप्शन दिले गेले आहेत, त्यापैकी पहिले 2.0-लीटर mStallion TGDi पेट्रोल इंजिन आहे, तर दुसरे 2.2-लीटर mHawk डिझेल इंजिन आहे, जे या SUV ला जबरदस्त शक्ती देते. यासोबतच या कारमध्ये 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा ऑप्शन देण्यात आला आहे.
फीचर्स :-
यात टिल्ट-अॅडजस्टेबल स्टिअरिंग व्हील, पॉवर विंडो, इलेक्ट्रिकली अँडजस्टेबल ORVM, रिमोट फ्लिप कीसह सेंट्रल लॉकिंग, ड्रिजिल रेजिस्टेंट इन्फोटेनमेंट स्क्रीन (Android Auto आणि Apple CarPlay साठी सपोर्टसह), प्लास्टिक फ्लोअर मॅट्स, वॉटर अँड स्ट रेजिस्टेंट कंट्रोल स्विच सोबत प्लगसारख्या फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. या कारचे इंटीरियर वॉटर फ्रेंडली करण्यात आलं आहे.
क्रूझ कंट्रोल, ABS विथ EBD, ड्युअल एअरबॅग्ज, हिल-होल्ड आणि हिल डिसेंट कंट्रोल यासारख्या सेफ्टी फीचर्सचा कारमध्ये समावेश करण्यात आला आहे.